सुरत : गुजरातमधील सुरतमधून आलेली एका तरुणीच्या आत्महत्येची(suicide) घटना पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतेय. १९ वर्षीय मॉडेल सुखप्रीत कौर हिनं तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या सततच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी महेंद्र राजपूतला चार महिन्यांच्या शोधमोहीमेनंतर अखेर अटक केली आहे.

सुखप्रीत ही मध्य प्रदेशातील शिवपुरीची रहिवासी होती. करिअर घडवण्यासाठी ती वर्षभरापूर्वी सुरतमध्ये आली होती. येथे ती सुरुवातीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत दिंडौलीत लिव्ह-इनमध्ये राहत होती. मात्र, काही काळानंतर मतभेद झाल्याने दोघांचं नातं तुटलं. सुखप्रीतने नवीन राहत्या घरी मैत्रिणींसोबत वास्तव्य केले. परंतु ब्रेकअपनंतरही महेंद्रकडून तिच्यावर अत्याचार सुरूच होते.

सुसाईड नोटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र सतत तिचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. त्याने तिला डांबून ठेवत बेदम मारहाण केली आणि ब्लेडने हातावर वार केल्याचाही उल्लेख आहे. अखेर या छळाला कंटाळून सुखप्रीतने आपलं आयुष्य संपवलं.घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. आत्महत्येच्या(suicide) कारणांबाबत सुखप्रीतने पोलिस अधीक्षकांना उद्देशून लिहिलेलं पत्र सापडलं. त्यामध्ये महेंद्रकडून झालेल्या अमानुष वागणुकीची सविस्तर माहिती देण्यात आली होती.

या आधारे महेंद्रविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, आरोपी फरार झाला होता. गेल्या चार महिन्यांपासून तो वेगवेगळ्या शहरांमध्ये लपून बसला होता. अखेर बुधवारी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
सध्या महेंद्र पोलिसांच्या ताब्यात असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा :

‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात? जाणून घ्या

Nothing ईअरबड्स लॉन्च: 22 हजारांखाली नवीन सुपर माइक फीचर

हायकोर्टाला पुन्हा बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून अलर्ट जारी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *