अनेकदा आपण बोलताना इंग्रजी शब्द वापरतो. अशाच एक शब्द म्हणजे झेरॉक्स(Xerox). ज्याला मराठीमध्ये काय म्हणतात हे आपल्याला माहीत नसतं . आजच्या काळात आपण कुठेही गेलो, शाळा–कॉलेजपासून सरकारी ऑफिसपर्यंत एक शब्द सतत ऐकायला मिळतो – “झेरॉक्स काढा.” कागदपत्रांची प्रत हवी असली की पहिल्यांदा डोक्यात येणारा शब्द म्हणजे झेरॉक्स. पण खरं तर “झेरॉक्स” हा शब्द मराठी किंवा हिंदी नाही, तो एका कंपनीचं नाव आहे.

झेरॉक्स(Xerox) ही अमेरिकन कंपनी आहे. १९०६ मध्ये तिची स्थापना झाली. या कंपनीने सर्वप्रथम फोटोकॉपी मशीन बनवून बाजारात आणले. त्यामुळे लोक फोटोकॉपीला सर्रास ‘झेरॉक्स’ म्हणून संबोधू लागले. म्हणजेच एखाद्या ब्रँडचं नावच संपूर्ण प्रक्रियेसाठी वापरलं जाऊ लागलं. जसं टूथपेस्टसाठी “कोलगेट” किंवा पेनसाठी “रेनॉल्ड्स” म्हणतात, तसंच.मराठीत “झेरॉक्स काढणे” असा वापर होतो, पण भाषाशुद्ध पर्याय आहेत – छायांकित प्रत छायाप्रत प्रतिलिपी प्रति काढणे / छायाप्रति काढणे
“आधारकार्डाची झेरॉक्स द्या” या ऐवजी “आधारकार्डाची छायाप्रत द्या” असं म्हणता येईल. “दोन झेरॉक्स काढून द्या” या ऐवजी “दोन छायाप्रती काढून द्या” हा योग्य पर्याय आहे.आज गावोगावी “झेरॉक्स सेंटर” किंवा “झेरॉक्स मशीन” अशी पाटी दिसते. प्रत्यक्षात त्या ठिकाणी छायाप्रती काढल्या जातात. म्हणजेच “झेरॉक्स” हा शब्द आता व्यवहारात एवढा रुळला आहे की त्याला पर्याय वापरणं थोडं कठीण वाटतं. तरीही भाषाशुद्ध वापरासाठी “छायाप्रत” हा शब्दच अधिक योग्य आहे.

भाषातज्ज्ञांच्या मते, व्यवहारात लोक जे सहज उच्चारतात तो शब्द लोकप्रिय होतो. “झेरॉक्स” असाच लोकप्रिय झाला. पण मराठी भाषेची शुद्धता राखण्यासाठी सरकारी कागदपत्रं, शाळा-कॉलेजमधील अधिकृत संवाद, पत्रव्यवहार अशा ठिकाणी “छायाप्रत” हा शब्द वापरणं महत्त्वाचं आहे. “झेरॉक्स” हा शब्द मराठी नाही, तो एका कंपनीचा ब्रँड आहे. योग्य मराठी शब्द म्हणजे छायाप्रत. मात्र सामान्य लोकांच्या व्यवहारात “झेरॉक्स” इतका वापरला गेला आहे की तो रोजच्या बोलण्यात पक्का झाला आहे.तरीही भाषेचा सन्मान ठेवायचा असेल तर पुढच्या वेळी कुणाला “झेरॉक्स काढून द्या” म्हणताना, “छायाप्रत काढा” असा शब्द जरूर वापरून बघा.
हेही वाचा :
Nothing ईअरबड्स लॉन्च: 22 हजारांखाली नवीन सुपर माइक फीचर
हायकोर्टाला पुन्हा बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून अलर्ट जारी
कोल्हापुरात खुनी हल्ला,दोघांना अटक….