सोशल मिडियावर नेहमीच अनेक अजब-गजब घटनांचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज इतके आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले असतात की यातील दृश्यांचा आपण कधी विचारही केला नसतो. भारताचा फेमस स्ट्रीट फूड पाणीपुरीचे(Panipuri) फक्त देशातच नाही तर जगभरात अनेक चाहते आहे. महिलांसाठी तर पाणीपुरी म्हणजे त्यांचे पहिले प्रेम. याच प्रेमापोटी आता एका महिलेने एक अनोखा प्रताप करुन दाखवला आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हियरल होत आहे.

पाणीपुरीच्या एका प्लेटमध्ये साधरण ६ पुऱ्या दिल्या जातात पण महिलेल्या एका दुकानदाराने ६ ऐवजी फक्त ४ पुऱ्या दिल्या कारणाने तिने भररस्त्यातच निषेध करण्याचा निर्णय घेतला. पाणीपुरीसाठी कोणीतरी निषेध करण्याची ही पहिलीच वेळ ज्यामुळे हे दृश्य पाहताच लोक अचंबित झाले आणि हा व्हिडिओ वेगाने शेअर करु लागले. चला तर मग व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ गुजरातमधील वडोदरा येथील आहे. व्हिडिओमध्ये चालू रस्त्यात आजूबाजूने गाड्या जात असतानाच महिल रस्त्याच्या अगदी मधोमध मांडी घालून बसल्याचे दिसून येते. यावेळी तिच्या चेहऱ्यावर राग असतो आणि हा राग पाणीपुरी कमी खायला मिळाल्याने तिला आहे असा दावा आता केला जात आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “दीदी रागावल्या आणि त्या इतक्या रागावल्या की त्या अशा निषेधावर बसल्या की कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल.

गुजरातमधील वडोदरा येथे, कमी पाणीपुरी(Panipuri) दिल्याने एका महिलेने रस्त्यावर निषेधावर बसून निषेध केला.पाणीपुरी विक्रेत्याने २० रुपयांना सहा पाणीपुरीऐवजी चार गोलगप्पा वाढले; गुजरातमधील वडोदरा येथे एक महिला रस्त्यावर बसली होती; डायल ११२ टीमने परिस्थिती हाताळली”.

हा व्हायरल व्हिडिओ @rajgarh_mamta1 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जर हा मुलगा असता तर पोलिसांनी आणि लोकांच्या गर्दीने त्याला आधी मारहाण केली असती, नंतर काय झाले असे विचारले असते आणि कारण कळल्यानंतर गाल आणि ती विशिष्ट जागा पुन्हा लाल झाली असती” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पाणीपुरी विकणाऱ्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली पाहिजे”.

हेही वाचा :

बॅटल रॉयल गेममध्ये सुरु झाला नवा Top-Up ईव्हेंट!

आशिया कप 2025 चा आजपासून रंगणार सुपर 4 चा थरार!

बजेट कमी आहे, मग ‘या’ 10 लाखांपेक्षा कमी किमतीच्या कारबद्दल घ्या जाणून

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *