आरोग्यासाठी संत्रे (orange)हे अत्यंत उपयुक्त फळ मानले जाते. फक्त चवेसाठीच नव्हे तर पोषक तत्वांनी भरलेले असल्यामुळे शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यास ते मदत करते. विशेष म्हणजे, दररोज सकाळी उपाशीपोटी संत्र्याचा ज्यूस घेतल्यास त्याचे फायदे दुप्पट होतात.

पचन सुधारते
उपाशीपोटी संत्र्याचा (orange)ज्यूस पिल्याने पचनसंस्था अधिक कार्यक्षम बनते. ज्यांना अजीर्ण, गॅस, किंवा इतर पचनासंबंधी त्रास आहेत, त्यांच्यासाठी हा रस उत्तम उपाय ठरतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्यामुळे तो नैसर्गिक इम्युनिटी बूस्टर आहे. सकाळी नियमित ज्यूस घेतल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो.
त्वचेला तजेला मिळतो
संत्र्याचा रस त्वचेसाठी वरदान आहे. तो त्वचेतील मळ व घाण दूर करून चेहरा उजळतो, तसेच त्वचेला नैसर्गिक मऊपणा व तजेला देतो.

ऊर्जा व ताजेतवानेपणा
उपाशीपोटी संत्र्याचा(orange) ज्यूस पिल्याने दिवसभरासाठी आवश्यक ऊर्जा मिळते. शरीराला ताजेतवानेपणा मिळतो आणि थकवा दूर राहतो. म्हणूनच, दररोज सकाळी उपाशीपोटी एक ग्लास संत्र्याचा रस पिणे हा उत्तम आरोग्याचा सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे.
हेही वाचा :
6 ऐवजी 4 पाणीपुरी दिल्या म्हणून भररस्त्यात जमिनीवर बसत केला निषेध; Video Viral
वृंदावनमध्ये कमी खर्चात राहण्याचे ठिकाण शोधत आहात?
बॅटल रॉयल गेममध्ये सुरु झाला नवा Top-Up ईव्हेंट!