रक्तप्रवाह आणि हृदयाशी संबंधित आजार वाढले आहेत. (diseases)त्यामुळे काही लक्षणं दिसताच तुम्ही लगेच डॉक्टरांकडे जावे. ही लक्षणं दिसल्यावर त्यांच्याडे दुर्लक्ष करू नये.

आजकाल हृदयासंबंधीचे आजार फार वाढले आहेत.(diseases) हृदयरोग, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, हार्ट ब्लॉकेज अशा अनेक आजारांमुळे व्यक्ती दगावल्याचे तुम्ही ऐकले असेल. यामुळेच तुम्हाला काही लक्षणं दिसताच सतर्क राहणे गरजेचे आहे. ही लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, असे मानले जाते.

तुमचा एखादा हात सतत दुखत असेल तर रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्याचा हा संकेत असून शकतो. हाताला होणार हात्र कधीकधी असह्यही होऊ शकतो. अशी काही लक्षणं दिसून आली तर लगेच डॉक्टरांकडे जावे.

शरीरात रक्ताचा प्रवाह सुरळीत होत नसेल तर त्वचेच्या रंगात बदल होतो. विशेषत: बोटांच्या त्वचेचा रंग बदलतो. बोट निळे, जांभळे दिसायला लागतात. थंडी, तणाव यामुळेदेखील बोटांच्या त्वचेच्या रंगात बदल होऊ शकतो. मात्र हे लक्षण पुन्हा-पुन्हा दिसत असेल तर तुम्हाला पेरिफेरल आर्टरी डिसिज होण्याचा हा संकेत असू शकतो. त्यामुळे लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या

शरीराच्या वरच्या भागात रक्तप्रवाह योग्य नसेल तर स्नायू हळूहळू कमजोर होतात. कोणतीही वस्तू कपडण्याची शक्ती कमी होते. साधे काम करतानाही हात थकून जातात. असे काही लक्षण दिसत असतील तर रक्तप्रवाह सुरळीत न होण्याचे हे संकेत असू शकतात. त्यामुळे लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हेही वाचा :

‘या’ एका गाण्यासाठी बॉबी देओलने घातल्या होत्या 9 जीन्स

अक्षय कुमारचा लग्नाबाबत मोठा खुलासा, ट्विंकलसोबत लवकर लग्न….

जायफळाचे ‘हे’ उपाय केल्यास दूर होईल आर्थिक संकट 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *