राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’(Bahin) योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.

योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांना वेळेवर मदत मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ई-केवायसी प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांची माहिती पडताळली जाईल. जर कोणाच्या माहितीत विसंगती असेल किंवा अटी पूर्ण न करत असल्याचे आढळले, तर त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

प्रक्रिया कशी कराल?

लाभार्थींनी https://ladakibahin.maharashtra.gov.in
या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करावी.

ही प्रक्रिया मोबाईल किंवा संगणकावरून सोप्या पद्धतीने करता येणार आहे.

यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

शासनाच्या परिपत्रकानुसार, निर्धारित कालावधीत ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना पुढील हप्ते रोखले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पात्र महिलांनी विलंब न करता तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.विशेष म्हणजे, ही डिजिटल पडताळणी भविष्यात इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे(Bahin).

हेही वाचा :

नवरात्रीचा पहिलाच दिवस राशींसाठी भाग्यशाली

नवरात्रीनिमित्त आपल्या प्रियजांनाना द्या या भक्तिमय शुभेच्छा

3,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच झाले नवीन स्मार्ट ग्लासेस!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *