शिरोळ प्रतिनिधी : हजारो भीमसैनिकांचा जयघोष, जय भीमच्या घोषणा आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या आगमन सोहळ्यापूर्वी संपूर्ण तालुक्यातून निघालेल्या भव्य भीमज्योत परिक्रमेची सुरुवात आज झाली. शिरोळ तालुक्याने(taluka) पन्नास वर्षांपासून पाहिलेले स्वप्न आता साकार होत असल्याने परिसरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.ही ऐतिहासिक परिक्रमा शिरोळ येथील पंचायत समिती आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झाली. सकाळी रमाबाई हाऊसिंग सोसायटी येथील बौद्ध विहारात भीमज्योत प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर समिती आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अन्य महामानवांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून परिक्रमेचा शुभारंभ करण्यात आला. जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

यावेळी जयसिंगपूरचे माजी उपनगराध्यक्ष युवा नेते संजय पाटील यड्रावकर म्हणाले जयसिंगपूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचे निश्चित झाले आहे त्यासाठी 28 सप्टेंबर रोजी आगमन सोहळा आयोजित केला आहे याकरिता शिरोळ तालुक्यात (taluka)भीम ज्योतीची परिक्रमा शुभारंभ होत आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देश घडवण्यासाठी संविधान दिले आहे त्यामुळे माणसे घडली या संविधानावर देश आपला चालतो हे प्रेरणादायी विचार सातत्याने जोपासण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या निमित्ताने बौद्ध समाजाबरोबर सर्व धर्मीयांच्या भावना एकत्र करून बाबासाहेबांच्या विचारांचा नवसमाज निर्मिती करण्याचा आपण प्रयत्न करूया असे सांगून ते म्हणाले 1251 ही जागा न्यायप्रविष्ठ असून तो लढा आम्ही सोडलेला नाही.
त्यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि नगरपालिकेच्या माध्यमातून जागा मिळेपर्यंत लढा चालू ठेवणार आहोत यासाठी स्वतः मे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहोत ते म्हणाले यासाठी विलंब लागणार म्हणून नजीक असलेल्या बागेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचे निश्चित केले असून त्यासाठी तालुक्यामध्ये भीम ज्योत परिक्रमा प्रारंभ करण्यात आली आहे या परिक्रमेचे आज शिरोळ येथे शुभारंभ पाहिल्यानंतर येथील बांधवांच्या मनातील आनंद ओसंडून वाहताना पाहिल्यानंतर मनस्वी आनंद होत आहे उत्साह जोश आणि उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे मन भारावून गेले असल्याचेही त्यांनी सांगितले ते म्हणाले रमेश शिंदे यांनी या पुतळ्या संदर्भातील विश्लेषण अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितले आहे त्यांचे आम्ही समर्थन करतो असे सांगून ते म्हणाले सर्वांना सोबत घेऊन हा डॉबाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आगमन सोहळा यशस्वी करणार आहोत.
कोणाच्याही मनामध्ये किंतु परंतु राहणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत असेही त्यांनी सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यातून प्रेरणादायी विचार मिळणार आहेत हा दृष्टिकोन ठेवून सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांच्या आगमन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले
डॉ बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते रमेश बापू शिंदे म्हणाले घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर ही आमची अस्मिता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा सन्मान करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे तेव्हा आमच्यातील गट तट बाजूला ठेवून डॉक्टर बाबासाहेबांच्या विचार साठी एक येणे ही काळाची गरज आहे.

मीही येतोय तुम्हीही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या आगमन सोहळ्यासाठी शिरोळ तालुक्यातील बौद्ध समाजासह बहुजन समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भव्य दिव्य स्वरूपात थाटात दिमा खदार सोहळा पार पाडूया असे कळकळीचे आवाहन रमेश बापू शिंदे यांनी केले ते पुढे म्हणाले कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे जयसिंगपूर नगरीला शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा लाभलेला आहेक्रांती चौकात पुतळा व्हावा अशी तमाम दलित बांधवांची इच्छा आहे त्यासाठी 1251 जागा मिळावी यासाठी न्यायालयात दाद मागितली आहे तो लढा आम्ही कायम लढणार आहोत जोपर्यंत जागा मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे .
असे सांगून ते म्हणाले त्या ठिकाणी यूपीसी एमपीसी केंद्रसुरू करून देणे दलित वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दारे खुले करण्यासाठी अभ्यासिका उपलब्ध करून देणार आहोत तसेच आसनावर बसलेले डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असे या ठिकाणचे कामाचे स्वरूप राहणार आहे असे त्यांनी सांगितले गेले वीस पंचवीस वर्षे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याचेस्वप्न पूर्ण होत आहे याचा मला आनंद होत आहे असे सांगितले.आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व जयसिंगपूर नगरपरिषदेमार्फत डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व भीमसृष्टी उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रविवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सायं. ४ वाजता जयसिंगपूर शहरात भव्य मिरवणुकीतून पुतळ्याचा आगमन सोहळा पार पडणार आहे.
या आगमन सोहळ्यापूर्वी तालुक्यातील प्रत्येक गावातून भीमज्योत परिक्रमा काढण्यात येत असून मुक्काम, भोजनदान व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परिक्रमेच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, बंधुता आणि समतेचा संदेश दिला जात आहे. प्रत्येक मुक्कामस्थळी व्याख्याने, समाजजागृती कार्यक्रम व सामूहिक भोजनदानाची सोय करण्यात आली आहे.
शिरोळ शहरात या परिक्रमेच्या पार्श्वभूमीवर प्रमुख रस्त्यांवर रांगोळी काढण्यात आली. गावोगावी सजावट, स्वागत व भव्य मिरवणुकीमुळे वातावरण उत्सवमय झाले होते. परिक्रमेतील प्रत्येक टप्प्यावर हजारो भीमसैनिकांची उपस्थिती जाणवत असून, या ऐतिहासिक क्षणाने संपूर्ण तालुका एकवटला आहे.
२८ सप्टेंबरला जयसिंगपूर शहरात होणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आगमन सोहळा हा शिरोळ तालुक्याच्या इतिहासातील अभूतपूर्व क्षण ठरणार आहे.या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील, डॉ. दगडू माने, संतोष एस आठवले , जयपाल कांबळे , संजय शिंदे , बाबासाहेब कांबळे , सेनापती भोसले , विश्वास कांबळे ,रामचंद्र कांबळे, ॲड. अनिरुद्ध कांबळे, सागर बिरणगे, योगिता कांबळे, सुरज कांबळे, खंडू भोरे, शशिकांत घाटगे, सुनील कांबळे, मल्हारी सासणे, दिलीप कांबळे, उमेश आवळे, संतोष कांबळे, अमोल शिरोळकर, कुमार कांबळे, अविनाश कांबळे, संभाजी भोसले, विश्वास कांबळे, राजेंद्र प्रधान यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा :
माझा हात रिकामी, काहीतरी काम द्या…; धनंजय मुंडेंची भर सभेत मागणी
लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी…..
अखेर सूरज चव्हाणला भेटली त्याची ‘बच्चा’,