शारदीय नवरात्रोत्सव हा देशभरात उत्साहाने आजपासून (navratri)साजरा केला जाणार आहे. यावेळी देवीची नऊ दिवस आराधना केली जाणार आहे. यंदा नवरात्रोत्सवाची सुरुवात आज 22 सप्टेंबर रोजी होत आहे आणि 1 ऑक्टोबरपर्यंत हा उत्सव साजरा केला जाणार आहे. तर 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा आहे. पौराणिक कथेनुसार, अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले. दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला, तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. नवरात्र उत्सवाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असून नवरात्रीच्या काळात देवी व तिच्या विविध रूपांची पूजा केली जाते. नवरात्रोत्सवनिमित्त तुमच्या आप्तस्वकीयांना, प्रियजनांना अशा द्या भक्तिमय शुभेच्छा.

शारदीय (navratri)नवरात्रीच्या शुभेच्छा
करुया उदो उदो अंबाबाईचा, मायेचा वाहे झरा
शहरी कोल्हापुरा, घेऊया लाभ दर्शनाचा उदो उदो
सर्वांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः
नमः प्रकृत्यै भद्रायै नियतः प्रणताः स्म तम् ।।
नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
सिंहावर स्वार होऊन, आनंदाचे वरदान घेऊन,
देवी अंबे प्रत्येक घरात वास करते,
नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली
जैसी वत्सालागी गाय, तैसी अनाथांची माय
नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्यातील प्रत्येक इच्छा पूर्ण होवो,
कोणतीही इच्छा अपूर्ण राहू देऊ नका.
हात जोडून, आम्ही दुर्गा मातेला प्रार्थना करतो,
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.
नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
आई ही जगाची रक्षक आहे.
आई ही मोक्षाचे निवासस्थान आहे.
आई ही आपल्या भक्तीचा पाया आहे.
आई ही सर्वांच्या रक्षणाचे मूर्त स्वरूप आहे.
नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
शारदीय नवरात्रीच्या या शुभ प्रसंगी,
देवी दुर्गा तुम्हाला सुख, समृद्धी, संपत्ती, वैभव आणि प्रगती देवो.
नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
सोन पावलांनी आदिशक्ती तुमच्या घरी येवो,
सुख-संपत्तीसह तुम्हाला उदंड आरोग्य मिळो.
शारदीय नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तुमच्यावर सदैव लक्ष्मीचा आशीर्वाद असो,
तुम्हाला सदैव सरस्वतीची साथ मिळो,
तुमच्या घरात सदैव गणेशाचे वास्तव्य असो,
माँ दुर्गेच्या आशीर्वादाने तुमचे आयुष्य अधिक प्रकाशमय होवो…!
शारदीय नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
देवी आदिशक्तीची कृपा तुमच्यावर सदा राहो।
अक्षय धन, सुख समृद्धी आणि ज्ञानाचा साठा होवो।।
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
आई ही प्रत्येक जीवासाठी मोक्षाचा मार्ग आहे,
आई ही जगाची पालनपोषण करणारी आहे,
आई ही प्रत्येकाच्या भक्तीचा पाया आहे,
आई ही अनंत शक्तीचे मूर्त स्वरूप आहे.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारी जन्ममरणांतें वारी ।
हारी पडलो आता संकट निवारी ॥
देवी आई आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो याच सदिच्छा!
हेही वाचा :
‘…तर तुझी चड्डी सुद्धा ठेवणार नाही’; शिवाजी वाटेगावकरांचा पडळकरांना थेट इशारा
भारत-पाक पुन्हा आमनेसामने, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
इचलकरंजी : कबनूर येथे पतीपत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला