राज्य आणि शहरातील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांवर असते आणि ती राखण्यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावणं अपेक्षित असतं. हेच पोलीस कर्मचारी आजुबाजूला असतील तर सर्वसामान्यांमध्ये आपण सुरक्षित आहोत अशी भावना निर्माण होणं गरजेचं असतं. पण मुंबईतील एका घटनेमुळे पोलीस जनतेचे मित्र आहेत की शत्रू असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचं कारण पोलीस(police) ठाण्यात एका महिला अधिकाऱ्याने सर्वसामान्यांना शिवागीळ केल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडीओ पाहिल्यानंतर महिला अधिकाऱ्याचं वागणं पाहून तुमचाही संताप होईल.

न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या नागरिकांशी महिला पोलीस उपनिरीक्षकाने अरेरावी केली, शिवीगाळ केली आणि तोंडावर नेमप्लेट फेकून मारल्याचा प्रकार समोर आला आहे. हा धक्कादायक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे आणि कारवाईची मागणी होत आहे.
20 सप्टेंबर 2025 रोजी, फेसबुकला यश कारंडे नावाच्या व्यक्तीने एका चिंताजनक घटनेची माहिती देणारा व्हिडिओ पोस्ट केला. यशने दावा केला की तो थकबाकीचे पैसे मागण्यासाठी द ड्रीम वीव्हर्सच्या कार्यालयात गेला होता, परंतु मालक लोकेंद्रने तो गैरहजर असल्याचं खोटं सांगितले. यशने त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा लोकेंद्रच्या मित्रांनी यशचा मित्र जयेशला धमकावलं आणि मारहाण केली.
यशच्या माहितीनुसार व्हीपी रोड पोलिस स्टेशनमध्ये गेले असताना पोलीस उपनिरीक्षक दुर्गा खर्डे यांनी शिवीगाळ केली. तिने यशच्या मित्राच्या चेहऱ्यावर तिचा बॅच फेकला आणि एफआयआर दाखल करण्यास नकार दिला. एका कॉन्स्टेबलने तक्रारदाराला वैयक्तिक कारणे सांगून व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट करू नये अशी विनंती केली.
व्हिडीओच्या सुरुवातीला तक्रारदार पोलीस (police)स्थानकात दिसत आहे. यावेळी महिला सांगते की, मॅडम मागील एक तासांपासून आम्ही थांबलो असून त्रस्त आहोत. त्यावर महिला अधिकारी तुम्ही हळू बोला असं ओरडत सांगते. यादरम्यान शाब्दिक वाद सुरु होता. यावेळी महिला अधिकारी, बाहेर काढ नाहीतर हिला मारेन मी अशी धमकी देते. तसंच हरामी साल्या अशी शिवीही देते.

यादरम्यान इतर पोलीस कर्मचाऱ्यांना महिला अधिकारी मर्यादा ओलांडत असल्याची जाणीव होत असल्याने तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. पण महिला अधिकारी काही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हती.यावेळी तक्रारदार महिला अधिकाऱ्याचं नाव पाहण्यासाठी वाकली असता तिला बॅच फेकून मारला जातो. यावेळी तो बॅच दाखवला असता त्यावर दुर्गा खर्डे, पोलीस उप निरीक्षक असं नाव दिसतं. तक्रारदार अधिकाऱ्याला आम्ही व्हिडीओ सोशल मीडियावर टाकणार असं सांगतो. त्यानंतर महिला अधिकारी शिवागीळ करत जाऊ दे म्हणते.
हेही वाचा :
पुजाऱ्यानेच केला तरुणीचा विनयभंग
जीएसटी दरात आजपासून कपात; दिवाळी होणार गोड
शिरोळ तालुक्यात भीमज्योत परिक्रमेची उत्साहात सुरुवात