सणासुदीच्या आधीच साखरेच्या दरात २-३ रुपयांची वाढ.(pockets)उत्पादन घट आणि खर्चवाढीमुळे दरवाढ.गणेशोत्सवात मिठाई महाग होण्याची शक्यता.ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. साखरेच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात साखर किलोमागे २ रुपयांनी महागली आहे. येत्या काही दिवसांमध्ये साखरेचे दर आणखी वाढणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना गणेशोत्सवापूर्वीच महागाईच्या झळा लागण्यास सुरूवात झाली आहे. सणासुदीच्या काळात साखर महागल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

सणासुदीच्या काळात साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सवापूर्वीच साखरेचे दर महागले आहेत. सणासुदीच्या काळात मिठाई आणि प्रसादामध्ये साखरेचा वापर केला जाते. आता साखर महागल्यामुळे सर्वासामान्यांच्या खिशाला फटका बसला आहे. साखरेच्या दरात किलोमागे २ ते ३ रुपयांनी वाढ झाली आहे. उत्पादन खर्च वाढल्याने कारखानदारांकडून साखरेच्या दरात वाढ करण्यात आली आहे. (pockets)त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात साखरेचे भाव कडाडले आहेत.

तसंच, केंद्र सरकाराने साखरेचा मासिक कोटा कमी केल्याने दरवाढ झाली असल्याने नागरिकांना दरवाढीची झळ सोसावी लागणार आहे. येत्या काही दिवसांत साखरेचे दर आणखी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून साखर उत्पादन कमी होत आहे त्याचाही फटका बसत आहे. (pockets)उत्पादन खर्च महागल्यामुळे येणाऱ्या काळात साखरेची आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

आंबेडकरांना भेटल्यानंतर महाराष्ट्रातील बड्या नेत्यानं असं का म्हटलेलं?

या टोपी खाली दडलय काय या मुकुटाखाली दडलय काय?

लाडक्या वरदविनायक बाप्पाच्या भेटीला भक्तांची मांदियाळी…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *