२१ वर्षांनी आलेली श्रावण मासातील अंगारकी (Angaraki)संकष्टी चतुर्थीनिमित्ताने पहाटे पासूनच पंचगंगा वरदविनायक मंदिरांमध्ये प्रचंड गर्दीआज अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्याने पंचगंगा नदी किनारी वरदविनायक मंदिरांमध्ये लाखो भाविकांचा महापूर ओसंडून वाहत आहे. पहाटे पासूनच भाविकांचे श्रद्धास्थान व जागृत देवस्थानामध्ये जाऊन भाविकांनी पूजा अर्चा करत विघ्नहर्त्या वरदविनायकाचे दर्शन घेतलं जातं होते .

या निमित्ताने मंदिरांची आकर्षक फुलांची सजावटीसह लाईट माळांची आरास करण्यात आली कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छता ही चोख ठेवण्यात आली.

तर वाहतूक व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी वाहतूक पोलीस उपस्थित होते .अंगारकी (Angaraki)संकष्टी गणेश चतुर्थीनिमित्ताने मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांनी प्रचंड गर्दी केली आपल्या लाडक्या दैवताचं दर्शन घेत हे भाविक. पूजा, आरती करत देवाला साकडे घातली जात होते यावेळी सामूहिक अथर्वशीर्ष ,स्तोत्र वेद,आरतीही करण्यात येत होती मंदिर भक्त मंडळ दु ११ वाजले पासून साबुदाणा भगर प्रसाद वाटप चालू होता पहाटेपासूनच भाविक मंदिरात दाखल होत होते. प्रत्येकजण रांगेत उभा राहून देवाचं दर्शन घेत होता. कोणतीही गडबड आणि गोंधळ न करता हे भाविक गर्दीतून मार्गक्रमण करत होते.
वरदविनायक दर्शनाचा सुमारे लाखभर भाविक लाभ घेतला होते. मंदिरात काकड आरती भक्त मंडळ कडुन करण्यात आली,तर सकाळ आरती श्री व सौ युवराज माळी यांच्या हस्ते तर साजसंध्याकाळची पुजा आरती जिल्हा न्यायाधीश गांधी व भोसले व इचलकरंजी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुषमा कोल्हे शिंदे यांनी केली चंद्रोदय रात्रौ आरती मंदिर भक्त मंडळ पदाधिकारी हजोरो भक्तजनांच्या साक्षीने मान्यवराच्या हस्ते बाप्पाच्या जयघोषात आरती करण्यात आली .
यावेळी मंदिर भक्त मंडळ अध्यक्ष अध्यक्ष अशोक स्वामी ,बाळासाहेब जांभळे, हनुमंत वाळवेकर विष्णुपंत शिंदे विनायक रेडेकर प्रशांत चाळके,सुनील ताडे गजानन स्वामी मोहन नाझरे सचिन देशमाने सुनील भैया तोडकर सुधीर जाधव बाळकृष्ण मिटारी गजानन पाटील विवेक मस्के यांनी दिवसभर सर्व कार्यक्रम व्यवस्थे साठी परिश्रम घेतले.
हेही वाचा :
अंधश्रद्धेचा कहर: चोरीच्या संशयितांना दिला मंतरलेला विडा”
“फक्त 4 दिवसांत ST ची 137 कोटींची कमाई, यशामागचं रहस्य उलगडलं”
स्वातंत्र्य दिन व संवत्सरी निमित्त महापालिकेचा निर्णय १५ व २७ ऑगस्ट