बॉलीवूड अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना लवकरच (Bollywood)प्रेक्षकांसाठी एक हटके शो घेऊन येत आहेत. या शोचं नाव आहे “टू मच विथ काजोल अँड ट्विंकल” हे आहे. या शोमध्ये नुकतीच सलमान खान आणि आमिरने हजेरी लावली होती.

बॉलीवूड अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना या (Bollywood)दोघीनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी एक हटके शो आणला आहे. या शोचं नाव आहे “टू मच विथ काजोल अँड ट्विंकल” हे आहे. याचा पहिला टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यात सलमान खान आणि आमिर खान पहिले पाहुणे म्हणून सहभागी होताना दिसले आहेत. या शोमध्ये सलमानने वडील होण्याची इच्छा व्यक्त केली. आता अभिनेता नक्की काय म्हणाला आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

“टू मच विथ काजोल अँड ट्विंकल” हा शो प्राइम व्हिडिओवर २५ सप्टेंबरपासून स्ट्रीम होणार आहे. दर गुरुवारी नवा भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. टीझरमध्ये आमिर खान त्याच्या पहिल्या पत्नी रीना दत्तासोबतच्या घटस्फोटाबद्दल बोलताना दिसला आहे. आमिरने सांगितलं की, त्या कठीण काळात सलमान खान पहिल्यांदा त्याच्या घरी आला आणि तिथूनच दोघांची खरी मैत्री सुरू झाली. त्याआधी आमिरला सलमानबद्दल नकारात्मक मत होतं.

आमिर पुढे म्हणाला, “मी सलमानवर खूप टीका केली होती, विशेषत: ‘अंदाज अपना अपना’ च्या शूटिंगदरम्यान, कारण तो वेळेवर यायचा नाही.” सलमान खाननेही या शोमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल स्पष्टपणे सांगितले. लग्न आणि नातेसंबंधांबद्दल तो म्हणाला, “जेव्हा जोडीदार खूप जवळ येतात तेव्हा मतभेद वाढतात. पण माझा विश्वास आहे की एकत्र राहून एकमेकांना सपोर्ट करणं महत्त्वाचं आहे. जर नातं टिकलं नाही तर त्याची जबाबदारी माझी आहे.” असे अभिनेता म्हणताना दिसला.

यावेळी सलमानने एक मोठं विधानही केलं. त्याने म्हटलं, “मला आता वडील व्हायचं आहे आणि मी लवकरच होणार आहे.” त्याच्या या वक्तव्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या शोमध्ये पहिल्या भागानंतर विकी कौशल, कृती सेनन, आलिया भट्ट, करण जोहर, गोविंदा, चंकी पांडे यांसारखे अनेक सेलिब्रिटीही दिसणार आहेत. काजोल आणि ट्विंकलची जोडी प्रेक्षकांना नवी मजा आणि धमाल गप्पा देणार हे नक्की.

सलमानने कतरिनाचे केले अभिनंदन

सोशल मीडियावर एक फोटो समोर आली आहे ज्यामध्ये सलमान खान त्याच्या इन्स्टाग्रामवर हँडलवर कतरिना कैफ आणि विकी कौशलला आई – वडील होण्याबद्दल शुभेच्छा देत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सलमानने लाल हृदयाच्या इमोजीसह “अभिनंदन” लिहिले आहे. हे लक्षात घ्यावे की व्हायरल पोस्ट बनावट आहे. सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर कतरिना कैफच्या प्रेग्नंसीची घोषणा करणारी पोस्ट शेअर केलेली नाही. सलमान खानच्या इन्स्टाग्राम हँडलवर अशी कोणतीही पोस्ट नाही. त्याने या जोडप्याच्या पोस्टवरही कोणतीही टिप्पणी केलेली नाही.

हेही वाचा :

FD मध्ये तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?

सोनं-चांदी गडगडलं, ग्राहकांसाठी हीच आहे खरेदीसाठी सुवर्णसंधी

उपवासाच्या दिवशी झटपट घरी बनवा कुरकुरीत साबुदाण्याची भजी,

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *