मनोरंजनसृष्टीतून आनंदाची बातमी समोर आली आहे, कारण सुप्रसिद्ध गायिका रिहाना तिसऱ्यांदा आई झाली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करून ही गुडन्यूज(good news) चाहत्यांना दिली आहे आणि बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे. रिहानाला ‘पॉप क्वीन’ म्हणून ओळखले जाते आणि तिने आपल्या गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

तिने मुलीचे नाव ‘रॉकी आयरीश मेयर्स’ ठेवले असून, जन्मतारीख 13 सप्टेंबर 2025 आहे. तिचा जोडीदार रॅपर रॉकी असून दोघे आता आई-बाबा बनले आहेत. रिहानाने दोन फोटो शेअर केले; एका फोटोमध्ये ती आणि तिची मुलगी एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये गुलाबी शूज दाखवले आहेत.रिहानाची आधीची दोन मुले रिझा आणि रायट आहेत. या वर्षीच्या मेट गालामध्ये तिने बेबी बंप फ्लॉन्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी (good news)दिली होती.

चाहत्यांकडून तिला सोशल मीडियावर शुभेच्छा आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. याआधी रिहानाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यात आपल्या दमदार परफॉर्मन्सने सर्वांचे लक्ष वेधले होते. मीडिया रिपोर्टनुसार, या लग्नात तिने तब्बल 66 ते 74 कोटी रुपयांमध्ये मानधन घेतले होते आणि गुजरातच्या जामनगरमध्ये तिचा कार्यक्रम भरवशाची ठरला होता.

हेही वाचा :

महिलेनं हंबरडा फोडताच अजित पवार आवाहन करत म्हणाले

कॅमेरा ऑन केला छतावर चढली अन्…. Video Viral

दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा, संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *