नवरात्रीच्या उपवासात सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही(breakfast) साबुदाणा भजी बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. कमीत कमी साहित्यामध्ये झटपट काही बनवण्याचे असल्यास तुम्ही साबुदाणा भजी बनवू शकता.

उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय खावं? असे प्रश्न सगळ्यांचं कायम पडतात. कायमच साबुदाणा खिचडी, वडा, बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची आमटी इत्यादी ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये साबुदाण्याच्या कुरकुरीत भजी बनवू शकता. घरात कायमच भजीचे अनेक वेगवेगळे प्रकार बनवले जातात. कांदाभजी, (breakfast) बटाटाभजी, टोमॅटोभजी, मिरची भजी इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भजी बनवल्या जातात. पण तुम्ही साबुदाण्याचा वापर करूनसुद्धा भजी बनवू शकता. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये एकदा तरी साबुदाण्याची भजी नक्की बनवून पहा. घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं साबुदाणा भजी खायला खूप जास्त आवडेल. जाणून घ्या साबुदाणा भजी बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:
साबुदाणा पीठ
बटाटा
जिऱ्याची पावडर
हिरवी मिरची पेस्ट
पाणी
तेल
वरीचे पीठ
मीठ
कृती:
साबुदाणा भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात हलके भाजून घेतलेले साबुदाणे आणि भगर एकत्र करून बारीक पावडर तयार करा.
कुकरमध्ये स्वच्छ धुवून घेतलेले बटाटा टाकून त्यात पाणी घाला आणि कुकरच्या ५ ते ६ शिट्ट्या काढा. यामुळे बटाटा व्यवस्थित शिजला जाईल.
मोठ्या वाटीमध्ये साबुदाणा पीठ आणि वरीचे पीठ एकत्र मिक्स करून घ्या.
त्यानंतर त्यात मॅश केलेला बटाटा, जिऱ्याची पावडर, चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा.
सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर कढईमधील गरम तेलात तुम्हाला हव्या त्या आकाराच्या भजी टाकून दोन्ही बाजूने कुरकुरीत तळून घ्या.
तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेल्या साबुदाणा भजी. हा पदार्थ तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता.
हेही वाचा :
योनीमध्ये गॅससाठी जबाबदार ठरतात 5 कारणं,
टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, बांगलादेशवर 41 धावांनी मात,
पितृपक्षामध्ये कोणत्या दिशेला दिवा लावल्यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात