माजी क्रिकेटपटू (cricketer)आणि अभिनेता योगराज सिंग हे सतता त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. अलिकडेच त्यांनी त्यांचा मुलगा आणि माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या लग्नाबाबत एक खळबळजनक खुलासा केला. त्यांनी त्यांच्या सून आणि मुलाशी असलेल्या नात्याबद्दल उघडपणे भाष्य केले. एकदा युवराज लग्नासाठी मुलगी शोधत असताना ‘वेगळ्या वंशांची मुलगी बघ’ असं सांगितल्याची कबुली योगराज यांनी दिली आहे. योगराज सिंग हे मध्यंतरी कृष्णांकसोबत एका यूट्यूब चॅनेलवरील चर्चेत सहभागी झाले होते. त्यांनी त्यांच्या मुलाशी असलेल्या नात्याबद्दल, त्यांच्या लग्नाबद्दल आणि त्यांच्या सुनेशी असलेल्या नात्याबद्दल उघडपणे भाष्य केलं.

‘मला आयरीश किंवा इंग्रजी मुलगी हवी होती’ योगराज सिंग यांनी एक जुनी आठवण सांगताना. जेव्हा युवराजचे 20 व्या वर्षी लग्न करण्यासंदर्भात आपल्यावर समाजिक दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस मी ते नाकारले, असं योगराज सिंग म्हणाले. “मी युवराजचे लग्न लवकर करावे असे लोकांना वाटत होते, पण मी म्हणालो, ‘तो योग्य वयाचा झाला आहे का?’ जेव्हा तो 38 वर्षांचा झाला तेव्हा मी म्हटले की तो आता याबद्दल विचार करू शकतो,” असं योगराज सिंग म्हणाले.
तसेच पुढे बोलताना योगराज सिंग यांनी, “मी त्याला म्हणालो, ‘मी तुझ्यासाठी जोडीदार निवडू शकत नाही, हे तुझं आयुष्य आहे… पण हो, मी एक गोष्ट नक्कीच सांगितली की लोक याला विरोध करतील म्हणून दुसऱ्या वंशाची मुलगी बघ. मला आमच्या कुटुंबात आयरीश किंवा इंग्लिश मुलगी हवी होती. मग हेझल आमच्या आयुष्यात आली,” असंही सांगितलं. या चर्चेदरम्यान योगीराज यांनी, युवराजच्या प्रशिक्षणाबद्दल अनेक खुलासेही केले. योगीराज यांनी आपल्या कठोर प्रशिक्षण पद्धतींमुळे लोक आपल्याला शिवीगाळ करायचे, असं सांगितलं. माझा मुलगा युवराजही मला ‘हिटलर’ आणि ‘ड्रॅगन’ म्हणत असे, असंही योगीराज यांनी सांगितलं. योगराज म्हणाले, “मी त्याला इतके जोरात ढकलले की शेजारीही पोलिसांना बोलावायचे.
तो देशावर असलेल्या प्रेमामुळे उत्तम खेळाडू बनला. विश्वचषकादरम्यान, तो कर्करोगाशी झुंजत होता, तरीही मी म्हणालो, ‘मी तुला गमावले तरी माझ्या मुलाच्या अंत्यसंस्कारात चितेला खांदा देण्यास मला अभिमान वाटेल.'”डिलांचं हे विधान ऐकून युवराज भावनिक झाला होता. “युवराज प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण झाला.” आजही, मी त्याचा रक्ताने माखलेला टी-शर्ट जपून ठेवला आहे. तो टी-शर्ट मला आठवण करून देतो की माझा मुलगा देशासाठी लढला आणि रक्त सांडले,” असंही योगीराज म्हणाले.

युवराज(cricketer) आणि हेझल यांना दोन मुले आहेत: मुलगा ओरियन आणि मुलगी ऑरा. दोघेही त्यांच्या मुलांसोबत आणि कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. हेझलने तिच्या सासरच्या आणि कुटुंबाशी असलेल्या तिच्या चांगल्या संबंधांबद्दल देखील वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.
हेही वाचा :
बोगद्यात भीषण अपघातानंतर कार पेटली, परिसरात धुरांचे लोट
बळीराजाच्या दारात शासन अश्रू पुसले जाणार काय?
‘जो काम करतो ना त्याचीच XX’; अजित पवारांनी पूरग्रस्त शेतकऱ्याला झापलं