मुंबईतील महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडवरील बोगद्यात कारचा भीषण अपघात(accident) झाला. अपघातानंतर कारला भीषण आग लागली आहे. बोगद्यातच कारला भीषण आग लागल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी कोस्टल रोडवरील वाहतूक वळवली आहे.कोस्टल रोडवरील ताडदेवजवळील बोगद्यात कारला अपघात झाला आहे. त्यामुळं येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हाजी अली आणि वरळी कनेक्टरवर वाहतूक वळवण्यात आली आहे. कारचा अपघात इतका भीषण होता की धुराचे लोट परिसरात पसरले होते. तसंच, अपघातामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अनेक वाहने पुन्हा बोगद्यातून बाहेर पडत होते.

कारला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. त्यानंतर कारवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे समोर आले आहे. मात्र ऑफिसच्या वेळेतच ही घटना घडल्याने कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे. कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कारला आग लागल्याने कॉस्टल रोड टनल (ताडदेव ) येथे दक्षिणेकडे व उत्तरेकडे जाणारी वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. दक्षिणेकडील कोस्टल रोड बोगद्यात एका कारला आग लागली. हाजी अली आणि वरळी कनेक्टरवर वाहतूक वळवण्यात आली. वाहनचालकांनो, कृपया त्यानुसार तुमचा मार्ग आखा, असं अवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे.

ताडदेवजवळील बोगद्यात एका कारला भीषण अपघात(accident) झाला. अपघातानंतर कारला भीषण आग लागली, ज्यामुळे धुराचे लोट परिसरात पसरले आणि वाहतूक कोंडी झाली.अपघात मुंबईतील कोस्टल रोडवरील ताडदेवजवळील बोगद्यात झाला. यामुळे बोगद्यातील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली.अपघातामुळे कोस्टल रोड बोगद्यात दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे जाणारी वाहतूक बंद झाली. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि अनेक वाहने बोगद्यातून बाहेर पडत होती.
हेही वाचा :
बळीराजाच्या दारात शासन अश्रू पुसले जाणार काय?
‘जो काम करतो ना त्याचीच XX’; अजित पवारांनी पूरग्रस्त शेतकऱ्याला झापलं
‘या’ ८ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी