मराठवाड्याला पावसाने झोडपलं असून या भागात झालेल्या शेतमालाच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी भूम-परांडासहीत सोलापूर-धाराशिव जिल्ह्यांतील गावांना भेट दिली. रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास, अजित पवार भूम-परांडा मतदारसंघातील देवगाव खुर्द येथील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. गावात जाऊन त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला, गावातील कुटुंबांची विचारपूस केली(farmer).

शेतकऱ्यांची(farmer) शेतं, नुकसानग्रस्त घरं आणि उध्वस्त झालेला संसार या साऱ्या गोष्टी त्यांनी प्रत्यक्ष पाहिल्या. यावेळी वेगवेगळ्या गावातील गावकऱ्यांना धीर देत आपलं सरकार शक्य त्या मार्गानं मदत करण्यासाठी ठोस पावलं उचलत असण्याचा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना दिला. मात्र यावेळेस धाराशीवमध्ये एका पूरग्रस्त शेतकऱ्याने नोंदवलेला आक्षेप ऐकून अजित पवार त्याच्यावर चांगलेच संतापल्याचं दिसून आलं.
पूरामुळे झालेलं नुकसान किती मोठं आहे याची जाणीव मला आहे. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ताबडतोब मदतकार्य सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पिकांचे पंचनामे जलद गतीनं पूर्ण करून शेतकऱ्यांपर्यंत मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीनं उपलब्ध करून द्या, असं देखील अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं असल्याची माहिती अजित पवारांनी गावकऱ्यांना दिली. अजित पवार गावकऱ्यांशी संवाद साधत असतानाच एका शेतकऱ्याने आपली तक्रार मांडताना एक विधान केलं. हे विधान अजित पवारांना चांगलंच खटलं आणि हातात माईक असतानाच त्याने शेतकऱ्याला झापलं.
“आम्हाला कळतं ना, आम्ही काय इथं गोट्या खेळायला आलोय?” असा सवाल अजित पवारांनी संपातून माईकवरुनच विचारला. “सकाळी सहाला सुरु केलंय बाळा मी करमाळ्याला. जो काम करतो ना त्याचीच मारा,” असं अजित पवार चिडून म्हणाले. हे ऐकताच उपस्थित हसू लागले. त्यावर अजित पवारांनी सर्वांकडे पाहत, “बघा ना आता. एवढं जीव तोडून सांगतोय. मला अजूनही एका ठिकाणी जायचं आहे. आम्हालाही कळतंय ना. आम्ही लाडक्या बहिणींनाच किती मदत करतोय. आज वर्षाला 45 हजार कोटींची मदत करतोय,” असंही सांगायला अजित पवार विसरले नाहीत. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

दरम्यान, आज तिसऱ्या दिवशी अजित पवार सकाळपासूनच पहाणी दौऱ्यावर आहेत. सकाळी आठच्या सुमारास अजित पवारांनी त्यांच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन केलेल्या पोस्टमध्ये, “आज बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त पाहणी दौऱ्याची सुरुवात मौजे पिंपळगाव घाटपासून केली. पूरामुळे शेतकरी बांधव आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर झालेला परिणाम तसंच गावातील झालेलं नुकसान प्रत्यक्ष पाहिलं, गावकऱ्यांना धीर दिला, त्यांचं मनोबल वाढवलं.
यावेळी पूल व लगतच्या परिसराची पाहणी करून पाण्याच्या प्रवाहामुळे झालेलं नुकसान आणि त्यामुळे निर्माण झालेल्या धोक्यांचा आढावा घेतला. पूरग्रस्तांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.पूरामुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलेलं मदतकार्य प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे. कोणताही पूरग्रस्त शेतकरी उपेक्षित राहणार नाही, याची खबरदारी प्रशासनानं घ्यावी, अशा सूचना यावेळी दिल्या,” असं म्हटलं आहे.
हेही वाचा :
‘या’ ८ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी
‘जेव्हा जोडीदार खूप जवळ…’
देशात या ठिकाणी आहे कुश्मांडा देवीच प्राचीन मंदिर,