राज्यात पावसाने हाहाकार माजवला असून अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली.(declared)हेच नाही तर अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आलाय. रेड अलर्टसह ऑरेंज अलर्ट अनेक भागांमध्ये जारी करण्यात आला. रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु आहे. मुंबई, पुणे, धाराशिव, नांदेड या भागात सकाळी पावसाचा जोर वाढला. मुंबई सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काळोखा पसरला आहे. दुसरीकडे पुण्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून भारतीय हवामान खात्याने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. बीडमध्ये रात्रभर पाऊस सुरू असल्याने बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पाणी घुसले. बीडमध्ये आज हवामान खात्याने येलो अलर्ट दिला. मुसळधार पावसाने कळंब तालुक्यातील संजीतपुर गावचा संपर्क तुटला. रात्रभर पडलेल्या पावसाने तेरणा नदीला पूर, तेरणा नदीच्या परिसरातील गावांना अलर्ट जारी करण्यात आला.(declared) गोंदिया जिल्ह्यात रात्री सर्वदूर मुसळधार पावसाने हजेरी लावली. रात्रभर बरसलेल्या या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील धान पिकाला याचा मोठा फटका बसला.

मध्यरात्रीपासून नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झालीये. नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आदेश काढले. नांदेड शहरातील जिल्हा परिषद मल्टीपर्पज हायस्कूल परिसरात तळ्याचे स्वरूप. नागरिकांनी खबरदारी घेण्याच जिल्हा प्रशासनाने आवाहन केले. सोलापुरातील सीना नदीत पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. सिना- कोळेगाव धरणातून , खासापुरी आणि चांदणी प्रकल्पतून 75 हजार 817 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु.

दक्षिण सोलापूर तालुक्यात आज पहाटेपासून सुरु असणाऱ्या जोरदार पावसामुळे उळे – कासेगाव पूल पुन्हा गेला पाण्याखाली. उळे – कासेगाव पुलावरून पाण्याचा प्रवाह जोरदार वाहत असल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालीये. आज सकाळपासून मुंबई उपनगरातील अंधेरी, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगांव आणि दहिसर भागात अधूनमधून पाऊस पडत आहे.सकाळपासून पावसामुळे कल्याण-सीएसएमटी मार्गावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्वच गाड्या उशिराने सुरू आहेत. शिव रेल्वे स्टेशन ते कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या गाड्या दहा मिनिटे उशिराने सुरू. कामावरती जाणाऱ्या चाकरमानी आणि प्रवासाचे हाल. (declared)रेल्वे प्रशासनाकडून विस्कळीत झालेल्या वेळापत्रक सुधारित करण्याचा प्रयत्न सुरू.

हेही वाचा :

वर्दीतल्या सैतानाचं हादरवणारं कृत्य!

PhonePe, GPay आणि Paytm वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी

YouTube वर आले जबरदस्त AI फीचर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *