ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे.(leader)अहिल्यानगर जवळ असलेल्या आरनगाव बाह्यवळण रस्त्यावर लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अज्ञात तरुणांनी हल्ला केला. नाश्ता करून पुढे जात असताना अज्ञात तरुणांनी काठ्यांनी गाडीवर हल्ला केला. आज पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथे ओबीसी एल्गार सभेसाठी लक्ष्मण हाके जात होते. दुपारी दोन वाजता त्यांची ही सभा होणार आहे. हल्ला झाला त्यावेळी लक्ष्मण हाके यांच्यासोबत पोलीस बंदोबस्त होता. अहिल्यानगर येथे वाहनावर झालेल्या हल्ल्यात लक्ष्मण हाके यांना काही झालेलं नाही. पण मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

आता दुपारची लक्ष्मण हाके यांची सभा होणार की नाही, हे अजून समजू शकलेलं नाही. लक्ष्मण हाकेंची पाथर्डी येथे सभा आहे. लक्ष्मण हाके मागच्या काही दिवसांपासून सांगत होते, की त्यांना धमकीचे फोन येत होते. याआधी त्यांच्या मुलाच्या वाहनावर असाच हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच त्यांनी सांगितलं होतं.पुण्याहून लक्ष्मण हाके सभेसाठी पाथर्डी येथे चालले होते. तेव्हाच मध्येच रस्त्यावर हल्ला झाल्याच त्यांच्या सहकाऱ्याने सांगितलं.(leader) हे हल्ला करणारे कोण होते? त्यांची माहिती मिळू शकलेली नाही. हल्लेखोरांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. हल्लेखोर अजूनही पोलिसांच्या पकडी बाहेर आहेत. लक्ष्मण हाके यांनी आजच्या सभेआधी सकाळी एक फेसबुक पोस्ट केलेली. जालन्याच्या सभेच्यावेळी सुद्धा लक्ष्मण हाके यांच्या एका सहकाऱ्याला अशीच मारहाण झाली होती.
“मी प्रामाणिकपणे भांडतोय, ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून, आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणून, मी एक मेंढपाळ धनगराचं पोरगं आहे, मी बॅनर छापू शकत नाही, गाडी ला पैसे देऊ शकत नाही, भले मोठे स्टेज लावू शकत नाही, कुणाला चहा पाजू शकत नाही, हे माहित असूनही तुम्ही आजपर्यंत मला साथ दिलीत, उपोषण आंदोलन असो की मोर्चे, एल्गार मेळावे असोत किंवा रॅली, तुम्ही ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात, मला पाठिंबा देत राहिलात, मी तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत

मी ओबीसी च्या बाजूने बोलत गेलो, भांडत गेलो, ओबीसीच्या छोट्या छोट्या जात समूहाना जोडत गेलो, लाखो माणसं जोडली पण शत्रू ची संख्या सुद्धा वाढत गेली, हल्ले झाले,(leader) झेलले, पण आत्ता सहन होत नाही,उद्या दैत्यानांदूर ता पाथर्डी जि अहिल्यानगर च्या ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन, मी आंदोलनात असेन किंवा नसेनही तुम्ही जेवढी साथ दिलीत त्याबद्दल जाहीर जाहीर आभार मानतो – लक्ष्मण हाके”
हेही वाचा :
वर्दीतल्या सैतानाचं हादरवणारं कृत्य!
PhonePe, GPay आणि Paytm वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी
YouTube वर आले जबरदस्त AI फीचर