राज्यातील वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखाली (rain)शासकीय व दंत महाविद्यालय तसेच संलग्नित रुग्णालयातील गट-क तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी सुरु असलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा आदेश वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिला आहे.राज्यात अनेक ठिकाणी मागच्या आठवड्याापासून अति मुसळधार पाऊस असल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या आपत्कालीन परिस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे अवघड झाले आहे. यामुळे सर्व परीक्षार्थींचे पुढील होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

वैद्यकीय शिक्षण व आयुष आयुक्तालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, 25 व 26 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. या संदर्भातील सुधारीत वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती आयुक्तालयाने दिली आहे. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर अद्ययावत माहिती तपासत राहावी, (rain)असे आवाहन आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. राज्यभरात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिकदृष्ट्या मोठे नुकसान झाले आहे. वाचनालये बंद असून अभ्यासाच्या साहित्याचे देखील नुकसान झाले असल्याचे सुळे यांनी म्हटले. याखेरीज वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत असून अनेक ठिकाणी वाहने पोहोचू शकत नाहीत अशी स्थिती आहे.

याच परिस्थितीत 28 सप्टेंबरला एमपीएससी राज्यसेवा परीक्षा होणार आहे असे त्यांनी सांगितले.मराठवाड्यातील निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचणे शक्य होणार नाही. (rain)त्यामुळे ही परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलावी आणि परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर ती घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की, कृपया आपण विद्यार्थ्यांचे म्हणणे लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याच्या संदर्भाने निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

हेही वाचा :

वर्दीतल्या सैतानाचं हादरवणारं कृत्य!

PhonePe, GPay आणि Paytm वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी

YouTube वर आले जबरदस्त AI फीचर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *