भारतामध्ये डिजिटल पेमेंट अपडेटला मोठ्या प्रमाणात वेग आला आहे.(payment) UPI च्या माध्यमातून लाखो व्यवहार रोज पार पडतात. आतापर्यंत QR कोड स्कॅन करून किंवा मोबाईल ॲप्सवरून पेमेंट करणे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलं होतं. मात्र, ग्रामीण भागात अजूनही अनेकांकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाहीये. या अडचणी लक्षात घेऊन Proxgy या स्टार्टअपने एक भन्नाट उपाय बाजारात आणला आहे.हा उपाय म्हणजे ‘Thumbpay’, ज्यामुळे केवळ अंगठ्याच्या सहाय्याने पेमेंट करता येणार आहे. म्हणजे QR कोड, स्मार्टफोन, इंटरनेट, कार्ड किंवा रोख पैशांची गरज भासणार नाही. फक्त अंगठ्याचा ठसा देऊन ग्राहक थेट आधार-लिंक्ड असलेल्या बँक खात्यामधून पेमेंट करू शकतात. त्यामुळे आता ज्या ग्राहकांकडे स्मार्टफोन नाही, असे ग्राहकही आता आरामात डिजिटल पेमेंट करू शकतात.

Thumbpay वापरण्यासाठी ग्राहकाने फक्त अंगठा डिव्हाइस वर ठेवावा लागतो. हा अंगठ्याचा ठसा स्कॅन होताच AEPS त्या व्यक्तीची ओळख पडताळली जाते. त्यानंतर UPI प्रणाली बँक-टू-बँक पेमेंट पूर्ण करते. ज्यामुळे QR कोड स्कॅन करण्याची, मोबाईल फोन घेऊन फिरण्याची किंवा कार्ड वापरण्याची आवश्यकता राहत नाही.(payment) कंपनीने या डिव्हाइसमध्ये सुरक्षेवर विशेष लक्ष दिले आहे. यात सर्टिफाइड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे, जो फ्रॉड डिटेक्शन तंत्रज्ञानासह काम करतो. याशिवाय ओळख पडताळणीसाठी लहान कॅमेरा सुद्धा बसवला आहे. स्वच्छतेसाठी UV स्टॅरिलायझेशन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे कितीही ग्राहकांनी सतत वापरले तरीही डिवाइस सुरक्षित राहील.

Thumbpay हे डिव्हाइस QR कोड आणि NFC पेमेंट्सलाही सपोर्ट करतं. त्यात UPI साउंडबॉक्स, 4G आणि वाय-फाय कनेक्टिव्हिटीची सोय उपलब्ध आहे. यामुळे ते दुकाने, पेट्रोल पंप, शोरूम किंवा अगदी ग्रामीण भागात सुद्धा सहज वापरता येईल.या डिव्हाइसची किंमत सुमारे ₹२००० इतकी ठेवण्यात आली आहे.(payment) हे बॅटरीवर चालत असल्यामुळे वीज पुरवठा नसलेल्या भागात सुद्धा याचा वापर करता येतो. त्यामुळे Thumbpay हे शहराप्रमाणेच ग्रामीण भागात सुद्धा डिजिटल पेमेंटला चालना देणारा प्रभावी साधन ठरू शकतं. Proxgyचं हे नवं तंत्रज्ञान विशेषतः ग्रामीण ग्राहकांसाठी गेमचेंजर ठरू शकतं.

हेही वाचा :

वर्दीतल्या सैतानाचं हादरवणारं कृत्य!

PhonePe, GPay आणि Paytm वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी

YouTube वर आले जबरदस्त AI फीचर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *