HDFC बँकेला दुबईत मोठा झटका बसला आहे. दुबई फायनांशियल (customers)सर्विसेज अथॉरिटी ने बँकेच्या दुबई इंटरनॅशनल फायनांशियल सेंटर शाखेवर निर्बंध लादले असून, यानुसार HDFC बँक आता DIFC शाखेत नवीन ग्राहकांना जोडू शकणार नाही. अथॉरिटीने २६ सप्टेंबर २०२५ रोजी बँकला नोटीस जारी केली आहे. त्यामध्ये नवीन ग्राहकांसाठी बँकेच्या सर्व सेवा थांबवल्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.नवीन ग्राहकांना कोणतीही वित्तीय सल्ला सेवा मिळणार नाहीत. गुंतवणूक व्यवहार कर्ज किंवा कर्जावर अग्रिम यांसह कस्टडी सेवा यावरही बँकेला परवानगी नाकारण्यात आली आहे.

याशिवाय, नवीन ग्राहकांशी संपर्क साधण्यास आणि कोणत्याही प्रकारच्या फायनांशियल प्रमोशनवरही निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंधांचा परिणाम फक्त नवीन ग्राहकांवर होणार आहे. सध्या DIFC शाखेत असलेल्या १,४८९ ग्राहकांना सिंगल आणि जॉइंट अकाउंट्स कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही. (customers)त्यांना पूर्वीप्रमाणेच आपल्या सेवांचा लाभ सुरळीतपणे घेता येणार आहे. HDFC बँकेने स्पष्ट केले आहे की, ते डीएफएसएच्या आदेशांचे पालन करत असून, या समस्येवर शक्य तितक्या लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. DFSA कडून लेखी स्वरूपात हा आदेश बदलला किंवा रद्द केला जाईपर्यंत हे निर्बंध लागू राहतील.

DFSA ने घेतलेल्या या कठोर निर्णयामागे दोन वर्षांपूर्वीचे एक जुने प्रकरण असल्याचे बोलले जात आहे. HDFC बँकेच्या UAE ऑपरेशन्सवर आरोप होता की त्यांनी जोखमीचे निवेश उत्पादन विकले, (customers)ज्यामुळे अनेक भारतीय गुंतवणूकदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.या घटनेमुळे बँकेच्या शेअर किमतींवरही नकारात्मक परिणाम झाल्याचे पूर्वी नोंदवले गेले होते. आता या निर्बंधांवर शेअर बाजार कसा प्रतिसाद देतो आणि HDFC बँक यातून बाहेर पडण्यासाठी कोणती पाऊले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
कुलदीप यादवची ऐतिहासिक कामगिरी,
भारतातील प्रत्येक शहरात पेट्रोलचा दर वेगवेगळा का आहे?
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा राजगिरा रताळ्याच्या खुसखुशीत पुऱ्या!