कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या राज्यात जोरदार पाऊस सुरू(rain) आहे. मात्र, या पावसाने इतका कहर केला की, काही भागात अतिवृष्टी झाली असून लोकांची घरे पूर्णपणे पाण्यात गेली आहेत. यासोबत पिकांचे मोठे नुकसान झाले. आजही मोठा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

राज्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलाय. अनेक गावे, शेती पाण्याखाली आहेत. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पूरस्थिती संदर्भात एक बैठक घेत (rain) जिल्हाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या. अजूनही धोका टळला नसून आजचा दिवस अलर्ट राहण्याची गरज आहे. नुकताच भारतीय हवामान विभागाने मोठा अंदाज वर्तवला आहे. उत्तर कोकण आणि घाटमाथ्यावर भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रमध्ये आजही विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या राज्यात जोरदार पाऊस सुरू असून पिके वाहून गेली आहेत. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, पुणे या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला. धुळे, आहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबारमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

प्रशासन देखील अलर्ट मोडवर असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न केली जात आहेत. ज्या भागात अतिवृष्टी झाली, त्याठिकाणी पंचनामे सध्या सुरू आहेत. मुंबईमध्ये रात्री पावसाचा जोर अधिक होता. आता रिमझिम पाऊस सध्या मुंबईमध्ये सुरू असून ढगाळ वातावरण आहे. काल दिवसभर मुसळधार पावसानंतर आज सकाळपासून मुंबई उपनगरात पाऊस बंद आहे. मुंबईमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

जाफराबाद तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांच्या खरीप पिकांसह उसाचे मोठे नुकसान झाले आहे. देवळेगव्हाण येथील 12 ते 13 शेतकऱ्याच मिळून जवळपास 90 एकर क्षेत्रावरील उसाच पीक आडवे झाले. पावसाच्या कमी अधिक प्रमाणामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढल्याचे बघायला मिळतंय. जालना जिल्ह्याच्या जाफ्राबाद तालुक्यातील देवळेगव्हाण, गाडेगव्हाण, बुटखेडा, लोणगाव यासह आसपासच्या परिसरात काल सायंकाळी आणि मध्यरात्री पावसाने हजेरी लावली.

शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांसह ऊसाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. देवळेगव्हाण या गावातील 12 ते 13 शेतकऱ्यांचा मिळून जवळपास 80 एकर क्षेत्रावरील ऊस जमीनदोस्त झाल्याने प्रचंड नुकसान झाले. दरम्यान जालना जिल्ह्यात पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी देखील शेतकऱ्यांची चिंता मात्र काही कमी झालेली नाही.

हेही वाचा :

साहिबजादा फरहानचं गोळीबार करत सेलिब्रेशन; अभिषेक शर्मानेही ‘L’ दाखवले

मध्यमवर्गीयांनंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; दिवाळीपूर्वी मिळणार तिहेरी भेट!

फडणवीस सरकारचा या वर्षातला सर्वात मोठा निर्णय! 1339 कोटी रुपये… 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *