देशातील गॅस ग्राहकांसाठी केंद्र सरकारतर्फे एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची तयारी सुरू आहे.(gas) आतापर्यंत ग्राहकांना फक्त एका कंपनीच्या डीलरमध्येच बदल करण्याची मुभा होती. मात्र, लवकरच हा नियम बदलणार असून, आता ग्राहकांना थेट गॅस कंपनी बदलण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.यामुळे गॅस पुरवठादारांची सेवा समाधानकारक नसेल, डिलिव्हरीला उशीर होत असेल किंवा डीलर मनमानी करत असेल, तर ग्राहकांना दुसऱ्या कंपनीचा पर्याय निवडणे सोपे होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना गॅस सेवा घेण्यात जास्त स्वातंत्र्य मिळणार आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक बोर्ड या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब करणार आहे. सध्याच्या नियमानुसार ग्राहकांना नवीन कनेक्शन न घेता फक्त त्याच कंपनीच्या दुसऱ्या डीलरकडून गॅस मिळू शकतो. पण या नव्या नियमानुसार, ग्राहक थेट दुसऱ्या कंपनीकडून गॅस सेवा घेऊ शकतील. (gas)यामुळे स्पर्धा वाढून ग्राहकांना उत्तम सेवा मिळेल अशी अपेक्षा आहे.विशेष म्हणजे, या निर्णयामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांनाही मोठा फायदा होणार आहे. अनेकदा खेड्यापाड्यात गॅस डिलिव्हरीला उशीर होतो किंवा सिलिंडरची टंचाई भासते. अशा वेळी ग्राहकांना पाहिजे असल्यास दुसऱ्या कंपनीकडून गॅस सिलिंडर मिळू शकेल.

तसेच, या बदलामुळे स्वतः गॅस कंपन्याही सतर्क राहतील. ग्राहकांना दुसऱ्या कंपनीकडे वळण्याचा पर्याय असल्यामुळे, डीलरशिपवर लक्ष ठेवणे आणि सेवा दर्जा उंचावणे गॅस कंपन्यांना बंधनकारक होईल. सेवा चांगली नसेल तर ग्राहक थेट कंपनी बदलू शकतील, ही मोठी सुधारणा ठरणार आहे.(gas)ग्राहकांसाठी ही सुविधा एक प्रकारे सिम कार्ड बदलण्याच्या प्रक्रियेसारखी असेल.जसे एका मोबाईल कंपनीची सेवा न आवडल्यास दुसऱ्या कंपनीकडे जाणे सोपे झाले आहे, तशीच गॅस ग्राहकांनाही सोय मिळणार आहे.एकूणच, देशातील गॅस ग्राहकांसाठी ही मोठी सकारात्मक घडामोड ठरणार आहे. नव्या नियमांमुळे ग्राहकांना जास्त पर्याय मिळतील आणि गॅस सेवा अधिक सुलभ व दर्जेदार होईल. सरकारच्या या निर्णयामुळे स्पर्धा वाढेल, डीलर्सवरील मनमानी आटोक्यात येईल आणि ग्राहकांना दिलासा मिळेल.
हेही वाचा :
कुलदीप यादवची ऐतिहासिक कामगिरी,
भारतातील प्रत्येक शहरात पेट्रोलचा दर वेगवेगळा का आहे?
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा राजगिरा रताळ्याच्या खुसखुशीत पुऱ्या!