सणासुदीचा हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे आणि केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना(employees) दिवाळीपूर्वी तीन मोठ्या भेटवस्तू देण्याच्या तयारीत आहे. मध्यमवर्गीयांना कर सवलती आणि नवीन जीएसटी दर लागू झाल्यानंतर, आता सरकारी कर्मचाऱ्यांची पाळी आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी खास ठरणार आहे. कोणत्या आहेत या तीन गोष्टी? जाणून घेऊया.

आठव्या वेतन आयोगाची स्थापना
केंद्र सरकार लवकरच आठवा वेतन आयोग स्थापन करणार आहे. सातवा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला होता आणि आता 10 वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. नियमानुसार, नवीन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्यासाठी 1.5-2 वर्षे आधी स्थापन होणे अपेक्षित आहे. येत्या ऑक्टोबर 2025 मध्ये सरकार संदर्भ अटी (ToR) जाहीर करून आयोगाची अधिकृत घोषणा करू शकते. यामुळे कर्मचाऱ्यांचा मूळ पगार वाढण्याची शक्यता आहे, ज्याचा फायदा लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होईल.
महागाई भत्त्यात वाढ (डीए हाइक)
सध्या कर्मचाऱ्यांना 55% महागाई भत्ता मिळत आहे. ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स (AICPI) नुसार, जुलै-डिसेंबर 2025 साठी डीए 58% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सरकार दिवाळीपूर्वी 3% डीए वाढीची घोषणा करू शकते. यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनमध्ये तात्काळ वाढ होईल, ज्याचा फायदा सणासुदीच्या खरेदीसाठी होईल.
दिवाळी बोनसची खैरात
दरवर्षीप्रमाणे यंदाही सरकार नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना उत्पादकता-लिंक्ड बोनस (PLB) किंवा तदर्थ बोनस देण्याची शक्यता आहे. यामुळे 30 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना रोख लाभ मिळेल, ज्यामुळे त्यांच्या सणांच्या खरेदीला बळ मिळेल.
का आहे ही तिहेरी खुशखबर?
निवडणूक वर्ष, वाढती महागाई आणि सणांचा हंगाम यामुळे सरकार कर्मचाऱ्यांना खूश ठेवण्यासाठी हे पाऊल उचलत आहे. ही तिहेरी भेट कर्मचाऱ्यांचा खिसा भरुन ठेवेल. आणि देशाच्या अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल. त्यामुळे यंदाची दिवाळी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंद, समृद्धी आणि पैशांनी भरलेली असेल, अशी शक्यता निर्माण झालीय.
हेही वाचा :
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ISRO आणि NASA त जाण्याची संधी
‘माझी नंणद आणि नवरा एकाच रुममध्ये…’, कुमार सानूच्या Ex wifeचा खळबळजनक आरोप
साहिबजादा फरहानचं गोळीबार करत सेलिब्रेशन; अभिषेक शर्मानेही ‘L’ दाखवले