लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची(installments)आतुरतेने वाट पाहत आहेत. सप्टेंबर महिना संपायला अवघे २ दिवस उरले आहेत. तरीही सप्टेंबरचे पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येणार का असाही प्रश्न विचारला जात आहे.लाडकी बहीण योजनेत सप्टेंबरचा हप्ता अजूनही दिला नाही म्हणजेच हा हप्ता ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता आहे.दरम्यान, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येऊ शकतो. मागील अनेक महिन्यांपासून हप्ता लांबणीवर जात आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत जर हप्ता लांबणीवर गेला तर सणासुदीच्या दिवशी जमा केला जाऊ शकतो.

ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिवाळीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर सप्टेंबरचा हप्ता अजून पुढे गेला तर दोन्ही महिन्याचे ३००० रुपये एकत्र येऊ शकतात. (installments)गेल्या अनेक महिन्यांपासून सणासुदीच्या दिवशी पैसे जमा केले जात होते. त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यातदेखील पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता लाडक्या बहिणींना ई केवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही ई केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. ई केवायसी करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने केवायसी करायची आहे. त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन केवायसी करायचे आहे.
हेही वाचा :
कुलदीप यादवची ऐतिहासिक कामगिरी,
भारतातील प्रत्येक शहरात पेट्रोलचा दर वेगवेगळा का आहे?
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा राजगिरा रताळ्याच्या खुसखुशीत पुऱ्या!