सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील भारतीय संघाने आशिया चषकावर नाव कोरले.(defeat)पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करत भारताने नवव्यांदा चषकावर नाव कोरले. संपूर्ण स्पर्धेत भारताने पाकिस्तानला ३ वेळा धूळ चारली. इतकेच नाही तर भारतीय खेळाडूंनी त्यांच्यासोबत हँडशेक अन् फोटो काढणेही टाळले. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंचा संयम गमावल्याचे दिसून आले. अंतिम सामन्यावेळी त्यांची चिडचिड स्पष्ट दिसत होती. पाकिस्तानचा कर्णधार सलामान आगा याच्या चेहऱ्यावर पराभवानंतर निराशा दिसत होती.

पुरस्कार वितरण सोहळ्यात त्याने चेक थेट फेकून दिला अन् पळ काढला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.आशिया चषकातील पराभव पाकिस्तानच्या जिव्हारी लागलाय. (defeat)भारताकडून पराभव झाल्याच्या वेदना सलमान आगा याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. पुरस्कार वितरण सोहळ्यात त्याने रनर-अप चेक सर्वांसमोर फेकून दिला. त्यानंतर त्याने उलच्या बोंबा मारल्या. भारताने पाकिस्तानचा अपमान केल्याचा सूर त्याने आवळला. सलमान आगा याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Salman agha gadiki ekkado kalinattu vundi lucha gadu #INDvPAK pic.twitter.com/GkEn7deKZj
— 𝙸𝚝𝚊𝚌𝚑𝚒 ❟❛❟ (@itachiistan1) September 28, 2025
पुरस्कार वितरण सोहळ्यात सलमान आगाने एशियन क्रिकेट कौन्सिल चे प्रतिनिधी अमीनुल इस्लाम यांच्याकडून रनर-अप चेक स्वीकारला आणि मागे वळून तो जमिनीवर फेकला. त्यानंतर प्रेक्षकांनी त्याची जोरदार हूटिंग केली. दरम्यान, पराभवानंतर सलमान आगा संतप्त झाला होता. तो म्हणाला, “हे सहन करणे आता खूप कठीण आहे. पण मला वाटते की, गोलंदाजीत उत्कृष्ट आम्ही उत्कृष्ट होतो. पण फलंदाजीत चांगली कामगिरी केली नाही.(defeat) त्यामुळेच फलकावर हव्या त्या धावा करू शकलो नाही.”सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, “विजयी संघाला स्मरणात ठेवले जाते, ट्रॉफीला नाही.” विजयी संघाला ट्रॉफी मिळाली नाही, असा अनुभव मला यापूर्वी कधीही आला नाही. पण माझ्यासाठी माझे खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारीच खरी ट्रॉफी आहेत, असेही सूर्या म्हणाला.
हेही वाचा :
कुलदीप यादवची ऐतिहासिक कामगिरी,
भारतातील प्रत्येक शहरात पेट्रोलचा दर वेगवेगळा का आहे?
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा राजगिरा रताळ्याच्या खुसखुशीत पुऱ्या!
