भारताने आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये पाकिस्तानी टीमला 5 विकेटने हरवलं.(defeated)यंदाच्या आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला हरवण्याची ही तिसरी वेळ आहे. ग्रुप स्टेज त्यानंतर सुपर-4 राऊंडमध्ये सुद्धा भारताने पाकिस्तानची वाईट अवस्था केली. चांगली स्टार्ट मिळाली असती, तर फायनलमध्ये सुद्धा भारताने पाकिस्तानवर अजून मोठा विजय मिळवला असता.आशिया कपची फायनल संपल्यानंतर मोठा वाद झाला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. भारतीय खेळाडूंची मोहसीन नकवी स्टेजवर वाट पाहत राहिले, पण टीम ट्रॉफी आणि विनिंग मेडेल स्वीकारण्यासाठी आली नाही.

भारतीय क्रिकेट टीमला सांगण्यात आलं की, मोहसीन नकवी ट्रॉफी देतील. पण टीम इंडियाने स्पष्टपणे नकार दिला. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने पूर्णपणे आपल्या टीमच समर्थन केलं.(defeated) ‘आशिया कपची ट्रॉफी भारतात आली पाहिजे, कारण भारताने ती जिंकली आहे’ असं बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया म्हणाले. बीसीसीआयने आयसीसीच्या पुढच्या बैठकीत नकवींविरोधात तक्रार नोंदवण्याचा प्लान केला आहे. भारताने ट्रॉफी घेण्यास नकार दिल्यानंतर मोहसीन नकवी ती ट्रॉफी स्वत:सोबत हॉटेलमध्ये घेऊन गेले.

मोहसीन नकवी हे आशियाई क्रिकेट परिषद आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चे चेअरमन आहेत. ते पाकिस्तानचे गृहमंत्री सुद्धा आहेत. नकवी हे भारतविरोधी भूमिकेसाठी ओळखले जातात. (defeated)भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढेल अशी वक्तव्य ते करत असतात. मागच्या महिन्यात मोहसीन नकवी यांनी पाकिस्तानचे सैन्य प्रमुख फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला होता. ज्यात मुनीर यांनी भारताला चमकती मर्सिडीज आणि पाकिस्तानला भंगाराने भरलेला डंपर ट्रक म्हटलं होतं. नकवी यांनी भारताला पोकळ धमकी देताना म्हटलेलं की, संघर्षाच्या स्थितीत गंभीर परिणाम होऊ शकतात.

मोहसीन नकवी हे फेब्रुवारी 2024 पासून पीसीबीचे अध्यक्ष आहेत. यावर्षी एप्रिल महिन्यात त्यांना आशियाई क्रिकेट परिषदेच चेअरमन बनवण्यात आलं. श्रीलंकन क्रिकेटचे प्रमुख शम्मी सिल्वा यांचं स्थान त्यांनी घेतलं होतं. नकवी जानेवारी 2023 ते फेब्रुवारी 2024 पर्यंत पंजाब प्रांताचे केअरटेकर मुख्यमंत्री होते. (defeated)त्यानंतर मार्च 2024 मध्ये ते पाकिस्तानचे गृहमंत्री झाले.मोहसीन नकवी पाकिस्तान पीपुल्स पार्टीचे नेते आसिफ अली झरदारी यांचे निकटवर्तीय मानले जातात. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाल्यानंतर नकवी यांनी आशियाला जागतिक क्रिकेटच केंद्र ठरवत आशिया खंडात या खेळाचा विस्तार करण्याचं आश्वासन दिलं होतं.

हेही वाचा :

कुलदीप यादवची ऐतिहासिक कामगिरी, 

भारतातील प्रत्येक शहरात पेट्रोलचा दर वेगवेगळा का आहे?

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा राजगिरा रताळ्याच्या खुसखुशीत पुऱ्या!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *