आशिया कपचा 20 दिवसांचा झंझावात अखेर थंडावला (return)असून अंतिम साम्यात पाकिस्तानला लोळवत टीम इंडियाने ट्रॉफीवर नाव कोरलं. फायनल मॅच, त्यानंतरच ड्रामा, ट्रॉफी न मिळणं या सगळ्यावरून झालेला वाद क्रिकेट चाहत्यांना बराच काळ लक्षात राहील. मात्र असं असलं तरी आता टीम इंडियाची पुढली घोडदौड पाहण्यासाठी चाहते बेताम असून त्यांचे आवडते खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना ब्ल्यू जर्सी घालून भारतीय संघासह मैदानात पुन्हा पाहण्यासाठी देखीलर चाहते अतिशय उत्सुक आहेत.भारतीय क्रिकेट चाहत्यांची वाट पाहण्याची ही वेळ लवकरच संपणार असून त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे. त्याचं कारण म्हणजे विराट आणि रोहित लवकरच टीम इंडियामध्ये पुन्हा दिसणार आहेत. रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये ते दोघे मैदानावर पुन्हा खेळताना दिसतील. टीम इंडियाचं पुढलं शेड्युलही जाणून घेऊया.

आशिया कपनंतर, आता टीम इंडियाची पहिली मालिका वेस्ट इंडिजविरुद्ध असेल. (return)या घरच्या कसोटी मालिकेत फक्त दोन सामने असतील. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना 2 ऑक्टोबरपासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे.
भारत वि वेस्ट इंडिज टेस्ट सीरीज 2025
पहिली कसोटी – 2-6 ऑक्टोबर नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम, अहमदाबाद
दुसरी कसोटी – 10-14 ऑक्टोबर अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
या दिवशी रोहित आणि विराट करणार पुनरागमन
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि हे दोन्ही दिग्गज आता फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळतात. टीम इंडिया ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाला रवाना होईल, जिथे ते प्रथम तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळतील. पहिला एकदिवसीय सामना 19 ऑक्टोबर रोजी ऑप्टस स्टेडियमवर खेळला जाईल, या दिवशी विराट आणि रोहितचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे.
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे शेड्यूल
पहिली वनडे : 19 ऑक्टोबर ऑप्टस स्टेडियम दूसरा वनडे: 23 ऑक्टोबर एडिलेड ओवल तीसरी वनडे: 25 ऑक्टोबर एस सी ग्राउंड पहिला टी20 सामना : 29 ऑक्टोबर मनुका ओवल दूसरा टी20 सामना : 31 ऑक्टोबर एमसीजी तीसरा टी20 सामना : 2 नोव्हेंबर बैलेरीव ओवल चौथा टी20 सामना : 6 नोव्हेंबर हेरिटेज बैंक स्टेडियम पाचवा टी20 सामना : 8 नोव्हेंबर गाबा स्टेडियमऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर, टीम इंडिया मायदेशीपरतेल आणि 14 नोव्हेंबरपासून घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धया घरच्या कसोटी मालिकेसाठी खेळणार आहे. त्यानंतर एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळली जाईल.
भारत वि. दक्षिण अफ्रीका 2025
पहिली टेस्ट: 14-18 नोव्हेंबर ईडन गार्डन्स दूसरी टेस्ट: 22-26 नोव्हेंबर (return) एसीए स्टेडियम पहिली वनडे: 30 नोव्हेंबर जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम दूसरी वनडे: 3 डिसेंबर शहीद वीर नारायण सिंह इंटरनेशनल स्टेडियम तिसरी वनडे: 6 डिसेंबर एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियमपहिला टी20 सामना : 9 डिसेंबर बाराबती स्टेडियम दूसरा टी20 सामना : 11 डिसेंबर पीसीए स्टेडियम तिसरा टी20 सामना : 14 डिसेंबर एचपीसीए स्टेडियम चौथा टी20 सामना : 17 डिसेंबर इकाना स्टेडियम पाचवा टी20 सामना : 19 डिसेंबर नरेंद्र मोदी स्टेडियम
हेही वाचा :
तोंडाला सुटेल पाणी!
‘दिवाळीपूर्वी शेतकर्यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’;
राज्यावर संकट, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा,