२०२५ हे रिटायरमेंटचे वर्ष आहे असे म्हणण्यास हरकत नाही.(retirement)या वर्षात मोठ्या खेळाडूंनी आपल्या खेळापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. याच वर्षी विराट कोहोली आणि रोहित शर्मा ने टेस्ट फॉरमॅट मधून रिटायरमेंट घेतली आहे. आणि आता या लिस्टमध्ये आणखी एक नाव जोडले गेले आहे. इंग्लंडचा ऑलराऊंडर क्रिस वोक्स यांनी काल सोमवार, २९ सप्टेंबरला आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून रिटायरमेंटची घोषणा केली. क्रिस सध्या ३६ वर्षाचा असून त्यांनी आपली १4 वर्षे इंग्लंड क्रिकेटला दिली आहेत.क्रिस वोक्सने पहिला सामना T-२० फॉरमॅटमध्ये २०११ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. आणि सुरू झालेल्या प्रवासात त्यांनी आपली छाप इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासात सोडली. जवळपास १२२ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत क्रिस खेळला असून तो २०१९ च्या ५० ओव्हर वर्ल्ड कपच्या विनिंग स्क्वॉडचा हिस्सा होता.

“वेळ आली आहे, मी ठरवले आहे की आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर जाण्याचा योग्य वेळ आहे. इंग्लंडसाठी खेळणे हे माझं लहानपणीचं स्वप्न होतं आणि मी भाग्यशाली आहे की माझे ते स्वप्न पूर्ण झाले. (retirement)इंग्लंडचे प्रतिनिधित्व करणे, ३ सिंह असलेली जर्सी परिधान करणे आणि १५ वर्षे सहकाऱ्यांसोबत खेळणे, ज्यांपैकी काही माझे अतिशय चांगले मित्र झाले. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असे स्टेटमेंट देत क्रिसने रिटायरमेंट घोषित केली.क्रिस ऑलराऊंडर खेळाडू आहे. त्यांनी टेस्ट फॉरमॅटमध्ये २९.६१ च्या अँवरेजसोबत १२९ विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर क्रिसने व्हाईट बॉल फॉरमॅटमध्ये ODI साठी १७३ विकेट घेतल्या आहेत. गोलंदाजीसोबतच त्याची फलंदाजी देखील इंग्लंडसाठी यशस्वी ठरली.

क्रिस वोक्सने शेवटचा सामना भारताविरुद्ध ओव्हल मैदानावर खेळला होता.(retirement) त्या सामन्यात तो जखमी झाला होता, ज्यामुळे तो गोलंदाजी करू शकला नाही. तरीसुद्धा तो तुटलेल्या खांद्याने फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. त्या रोमांचक सामन्यात भारताने ६ धावांनी विजय मिळवला होता. त्या मालिकेत वोक्सने एकूण ११ बळी घेतले होते. ॲशेस मालिकेसाठी इंग्लंडच्या संघात निवड न झाल्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. परंतु मी काउंटी क्रिकेट खेळत राहतील असेही त्यानी सांगितले त्याच्या या घोषणेनंतर “इंग्लंडसाठी क्रिससारखे खेळाडू प्रतिनिधित्व केले याबद्दल आपण ऋणी आहोत, आणि गेल्या १४ वर्षांत इंग्लंडच्या जर्सीत त्याने जे काही केले त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो आणि त्याचे अभिनंदन करतो.” असे वक्तव्य इंग्लंड पुरुष क्रिकेटचे मॅनेजिंग डायरेक्टर रॉब की यांनी केले.
हेही वाचा :
तोंडाला सुटेल पाणी!
‘दिवाळीपूर्वी शेतकर्यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’;
राज्यावर संकट, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा,