सणासुदीच्या काळात सर्व सामान्यांना महागाईचा चटका बसणार आहे.(shock)आधीच पूरस्थितीने होरपाळलेल्या नागरिकांना आता एसटीच्या दरवाढीचा चटका बसणार आहे. सर्व सामान्यांसाठी हक्काची असेलल्या लालपरी म्हणजेच एसटीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही दरवाढ दिवाळीसाठी असून एसटीच्या तिकिट दरामध्ये दहा टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरात कामासाठी गेलेले चाकरमान्यांना दिवळीला घरी जाताना जास्तीचे शुल्क द्यावे लागणार आहे

महाराष्ट्र परिवहन महामंडळाने एसटीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. दिवाळीत प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे दरवाढीचा एसटीला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. (shock)१५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात एसटीच्या तिकिट दरात १० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, जानेवारी २०२५ मध्ये एसटी महामंडळाने १४.९५ टक्के भाडेवाढ लागू केली होती. हे दर एस टीच्या सर्व सेवांसाठी लागू करण्यात आले होते.आता पुन्हा दिवाळीत एसटीचे दर वाढवल्यामुळे सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होणार आहे.
एसटी महामंडळाच्या सर्व बसेसाठी ही १० टक्क्यांची दरवाढ नाही. शिवनेरी आणि शिवाई या दोन बसेससाठी जुनेच तिकिटाचे दर असतील. शिवशाही, शिवनेरीसह इतर एसटी बसेसाठी दिवळीत १० टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयाचा फटका राज्यातील सर्वसामान्यांना बसणार आहे.(shock) आधीच पावसामुळे होत्याचे नव्हते झालेय. दिवाळी कशी साजरी करायची? हे संकट उभे राहिलेय, त्यात आता एसटीची दरवाढ करण्यात आली आहे. दिवाळीच्या काळात आता एसटी प्रवासासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे.

एसटी महामंडळाने दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना, विशेषत(shock) दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना दिवाळीत अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. सणासुदीच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे एसटीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढेल, असा या दरवाढीमागे हेतू असल्याचे सूत्रांनी सांगितले. पण या दरवाढीमुळे सामान्य प्रवाशांचा खिसा मात्र रिकामा होणार आहे.
हेही वाचा :
तोंडाला सुटेल पाणी!
‘दिवाळीपूर्वी शेतकर्यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’;
राज्यावर संकट, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा,