अनेकांना हे ठाऊक नाही पण आपल्याला जाणवणाऱ्या (problems)अनेक समस्यांचा उपाय हा आपल्या स्वयंपाकघरातच दडलेला असतो. 4 देसी मसाले ज्यांचा वापर आपल्यासाठी कोणत्या चमत्काराहून कमी नाही.

बऱ्याचदा अनेक समस्येवरचा उपाय हा आपल्या घरातच दडलेला असते, ज्याकडे आपले लक्ष जात नाही. स्वयंपाकघरात आढळणारे मसाले अनेक औषधी गुणधर्मांनी भरलेले(problems) असतात, ज्यामुळे यांचा वापर केसांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, आपल्या स्वयंपाकघरातील हळद, दालचिनी, लवंग आणि मेथीसारखे केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर त्वचा आणि केसांना आतून पोषण देण्याचेही काम करतात. हे चार देशी पदार्थ आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी कोणत्या वरदानाहून कमी नाहीत. प्रसिद्ध डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर जुश्या भाटिया सरीन यांनी या चार देसी पदार्थांचे महत्त्व समजावून सांगितले आहे. चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हळद

जुन्या काळापासून जखम ठिक करण्यापासून ते त्वचा निखळ बनवण्यापर्यंत हळदीचा अनेक वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो. यातील र्क्यूमिन या संयुगात दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे मुरुमे, डाग आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. याच्या वापरामुळे त्वचा स्वच्छ, चमकदार आणि निखळ बनण्यास मदत होते. शिवाय हे टाळूला आराम देते ज्यामुळे कोंडा, केसगळती असा समस्यांपासून आराम मिळतो.

दालचिनी

दालचिनीचा गोड आणि तिखट सुगंध जेवणाची चवच वाढवत नाही तर आरोग्याला अनेक फायदेही मिळवून देतो. याचे सेवन शरीरात रक्तभिसरण प्रक्रिया सुधारते, त्वचेला पुरेसे ऑक्सिजन मिळवून देते आणि शरीरातील पोषण सुनिश्चित करते. दालचिनी केसांना मजबूत करते, केसगळती कमी करते आणि केसांना जाड आणि चमकदार बनवण्यास मदत करते.

लवंगा

लवंगातील अँटीमायक्रोबियल आणि अँटीफंगल गुणधर्मांमुळे ते त्वचा आणि टाळूच्या समस्यांसाठी एक उत्तम पर्याय बनतात. याचे सेवन मुरुम निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांशी लढतात आणि त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. यासहच केसांवरही याचा चांगला परीणाम दिसून येतो. तुम्ही केसांसाठी लवंगाचे तेल वापरु शकता. हे केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी, टाळूला पोषण देण्यासाठी आणि केसांच्या वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी ठरेल.

मेथीदाणे

कडुसर मेथीदाणे केसांसाठी आणि त्वचेसाठी अैाषधी उपाय ठरतो. केसांसाठी हे एक सुपरफूड मानले जाते. यामध्ये प्रथिने आणि निकोटिनिक ॲसिड भरपूर प्रमाणात असतात, जे केसगळती थांबवण्यास आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यास मदत करतात. मेथीची पेस्ट करुन केसांना लावल्याने केस मजबूत, मऊ आणि चमकदार होतात.

हेही वाचा :

जेवल्यानंतर आता नाही येणार झोप! 

उपाशी पोटी नियमित एक सफरचंद खाल्ल्यास शरीरात दिसून येतील ‘हे’ मोठे बदल,

आज ऑक्टोबरचा पहिलाच दिवस राशींसाठी भाग्यशाली! कुबेराचा खजिना उघडणार,

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *