दुपारच्या जेवणानंतर येणारी सुस्ती टाळण्यासाठी पाणी(fresh) पिणं, श्वसन-व्यायाम, स्ट्रेचिंग आणि ताज्या हवेत वेळ घालवणं उपयुक्त ठरतं.

दुपारच्या जेवणानंतर बहुतेक लोकांना सुस्ती येते, डोळे मिटायला लागतात आणि शरीर जडसर वाटू लागतं. ऑफिसमध्ये काम करताना ही झोप productivity कमी करते. पण (fresh) काही साध्या आणि सोप्या सवयी अंगीकारल्यास आपण हा आळस टाळू शकतो आणि दिवसभर उत्साही राहू शकतो.
सर्वप्रथम पाणी पिण्याची सवय महत्त्वाची आहे. डिहायड्रेशन म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास पटकन थकवा जाणवतो. त्यामुळे थोड्या-थोड्या वेळाने पाणी प्यावं. यामुळे शरीराला freshness मिळतो आणि झोप येत नाही. त्यानंतर दीर्घ श्वास घेणे आणि स्ट्रेचिंग उपयोगी ठरते. काही सेकंद खोल श्वास घेऊन सोडल्याने शरीरात ऑक्सिजन वाढतो. हलके हात-पाय ताणून घेतल्याने blood circulation सुधारतो. या छोट्या व्यायामामुळे मेंदू ताजेतवाने राहतो आणि सुस्ती दूर होते.
दुपारी चहा किंवा कॉफीवर अवलंबून राहण्याऐवजी ग्रीन टी, लिंबूपाणी किंवा आलं-तुलसीसारखी हर्बल टी घ्यावी. हे पेय शरीराला हलके ठेवतात, पचन सुधारतात आणि झोप दूर करतात. जडसर वाटण्याऐवजी freshness जाणवते. काम करताना सतत एकाच प्रकारचं काम केल्याने कंटाळा येतो. त्यामुळे थोडावेळ कामात बदल करणे गरजेचे आहे. नवीन किंवा क्रिएटिव्ह काम सुरू केल्याने मन ताजं होतं आणि एकसुरीपणा कमी होतो.
ताजी हवा घेणं हे आणखी एक उत्तम उपाय आहे. खिडकीजवळ बसून थोडावेळ बाहेर पाहिल्यास किंवा ऑफिसच्या बाहेर काही मिनिटं चालल्यास शरीराला आणि मनाला ऊर्जा मिळते. याशिवाय डोळ्यांना विश्रांती देणं आवश्यक आहे. सतत संगणक किंवा मोबाईल स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे दर 20 मिनिटांनी स्क्रीनवरून नजर दूर करून किमान 20 फुटांवरील एखाद्या वस्तूकडे पाहावं. या 20-20 नियमामुळे डोळ्यांचा थकवा कमी होतो आणि मेंदूला छोटा ब्रेक मिळतो.
सारांश असा की, जेवल्यानंतर येणारी झोप नैसर्गिक असली तरी ती आपल्या कामगिरीवर हावी होऊ देऊ नये. पाणी पिणं, श्वसन व्यायाम, हलकी स्ट्रेचिंग, योग्य पेयांची निवड, कामात बदल, ताजी हवा आणि डोळ्यांना विश्रांती हे सगळे छोटे-छोटे उपाय दिवसभर ऊर्जावान राहण्यासाठी मदत करतात. हे उपाय अवलंबल्यास ऑफिसमध्ये आळस न येता लक्ष केंद्रित राहील, काम जलद आणि परिणामकारकपणे पूर्ण होईल आणि आपण संपूर्ण दिवस उत्साही व निरोगी राहू शकू.
हेही वाचा :
तोंडाला सुटेल पाणी!
‘दिवाळीपूर्वी शेतकर्यांना 1200 रूपयांची ऊस बिले देणार’;
राज्यावर संकट, भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा,