बॉलीवूडमध्ये (Bollywood news)अनेक कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. अभिनेता सलमान खाननंतर अभिनेता कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार करण्यात आला. मध्यंतरी अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर देखील गोळीबार झाला. त्याचबरोबर प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन, रॅपर आणि बिग बॉसचा विजेता मुनव्वर फारूकी याला काही दिवसांआधी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.

मुनव्वरची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. यानंतर मुनव्वरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. दरम्यान मुन्नवरच्या जीवावर उठलेल्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. २०२४ मध्ये मुनव्वरला धमकी देण्यात आली होती. जवळपास वर्षभरानंतर मुनव्वरच्या जीवावर उठलेल्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
गुरुवारी दिल्ली पोलिसांना याप्रकरणी मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांच्या एका पथकाने रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार टोळीतील दोन सदस्यांना एन्काउंटरनंतर अटक केली. त्यांच्या अटकेनंतर पोलिसांनी उघड केले की अटक केलेल्या दोन्ही सदस्यांनी स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Bollywood news)यांना मारण्याची धमकी दिली होती. दिल्ली पोलिसांच्या एका पथकाने गस्त घातली होती. थकाने ताबडतोब कालिंदी कुंजमधील पुष्ता रोडवर सापळा रचला. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास, मोटारसायकलवरून आलेल्या दोन्ही संशयितांनी पोलिसांना पाहताच पळ काढला आणि गोळीबार केला.
प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी त्यांच्या पायात गोळ्या घालून त्यांना पकडले. चकमकीनंतर पोलिसांनी गोल्डी ब्रार टोळीतील साहिल आणि राहुल या दोन सदस्यांना अटक केली. साहिल हा हरियाणातील भिवानी येथील आहे, तर राहुल हा पानिपत येथील आहे.
दोन्ही गुन्हेगारांना अटक केल्यानंतर पोलिसांनी उघड केले की ते परदेशात राहणारा गुंड रोहित गोदारा याच्या सूचनेनुसार काम करत होते. पोलिसांनी सांगितले की रोहित गोदारा गोल्डी ब्रार आणि वीरेंद्र चरण यांच्यासोबत काम करतो आणि या तिघांनी मुनव्वर फारुकी यांना मारण्याची योजना आखली होती. गोल्डीने साहिल आणि राहुल यांना मुनव्वरला मारण्याची जबाबदारी सोपवली होती, परंतु दिल्ली पोलिसांनी त्यांची धोकादायक योजना प्रत्यक्षात येऊ दिली नाही.

दोन गोळीबार करणाऱ्यांबद्दल माहिती देताना पोलिसांनी सांगितले की राहुल २०२४ मध्ये हरियाणातील यमुना नगर येथे घडलेल्या तिहेरी हत्याकांडात हवा होता. पोलिसांनी सांगितले की आजच्या एन्काउंटरमध्ये राहुलला गोळी लागली. २०२४ मध्ये दिल्ली पोलिसांना मुनव्वर फारुकी धोक्यात असल्याची माहिती मिळाली. या माहितीनंतर मुनव्वरला दिल्लीहून मुंबईला पाठवण्यात आले. मुनव्वर फारुकीला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडूनही धमक्या येत आहेत.
मुनव्वर फारुकी हा एक प्रसिद्ध कॉमेडियन कलाकार आणि रॅपर आहे. तो अनेक रिॲलिटी शोमध्ये दिसला आहे. तो बिग बॉसचा स्पर्धक आणि विजेता देखील होता. मुनव्वर फारुकी यांचे सोशल मीडियावरही लक्षणीय चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांचे १.४ कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच त्याचा चाहता वर्ग देखील जास्त आहे.
हेही वाचा :
२ लाख घेऊन दलालाने जुळवलं लग्न, पहिल्याच रात्री नवरीने…
‘मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होणार’; खासदार शाहू महाराज यांचा इशारा
कार अपघातात कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video