पुन्हा एकदा मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटींच्या ठिकाणांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच कपिल शर्माच्या नाइट क्लबवर झालेल्या हल्ल्यानंतर(attacks)आता लोकप्रिय रॅपर बादशाहच्या नाइट क्लबवर हल्ल्याची घटना समोर आली आहे.ही घटना ऐकून बादशाहचे चाहते चांगलेच घाबरले आहेत. चंदीगडच्या सेक्टर-26 परिसरात असलेल्या त्याच्या नाइट क्लबवर बुधवारी पहाटे अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, बादशाहच्या नाईट क्लबवर पहाटेच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला.

हल्ल्यानंतर लगेचच चंदीगड पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.आरोपीची ओळख पंजाबच्या फरीदकोट येथील दीपक अशी पटली आहे. प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की दीपकचा संपर्क कुख्यात गँगस्टर गोल्डी बराडशी होता. आरोपीला दिल्लीमधून अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे.याआधी देखील बादशाहच्या क्लबला लक्ष्य केले गेले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात बाइकस्वारांनी क्लबच्या बाहेर देसी बॉम्ब फेकून स्फोट घडवून आणला होता.

त्यावेळीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र स्फोट इतका जोरदार होता की क्लबचे काचेचे भाग पूर्णपणे खराब झाले होते.सध्या पोलिसांकडून आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि हल्ल्यामागील कारणांचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर क्लबच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बादशाहचं खरं नाव अधित्य प्रतीक सिंग सिसोदिया असून त्याचा जन्म 19 नोव्हेंबर 1985 रोजी दिल्ली येथे झाला. हिप-हॉप, पॉप आणि पंजाबी गाण्यांसाठी बादशाह प्रसिद्ध आहे. त्याने सुरुवातीला यो यो हनी सिंग सोबत माफिया मुण्डीर या ग्रुपमधून कारकीर्द सुरू केली आणि नंतर स्वतंत्र रॅपर म्हणून लोकप्रिय झाला.
त्याचे ‘डीजे वाले बाबू’ यांसारखी अनेक हिट गाणी चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. गायकाबरोबरच तो एक गीतकार आणि संगीतकार देखील आहे.हा हल्ला 13 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे चंदीगडच्या सेक्टर-26 परिसरातील त्याच्या नाइट क्लबवर झाला.नाही, सुदैवाने या हल्ल्यात (attacks)कोणतीही जीवितहानी झाली नाही.पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू करत एका आरोपीला अटक केली, ज्याची ओळख पंजाबच्या फरीदकोट येथील दीपक या नावाने झाली.
हेही वाचा :
३ दिवस बँका राहणार बंद, कधी आणि कुठे?
कोकणात जाणाऱ्यांना बाप्पा पावला; मोफत प्रवास, जेवण अन्….
नवऱ्याने बायकोला झोपायला बोलावले अन्…