सोशल मिडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.(twisted) यात एक महिला आपल्या वृद्ध सासूला बेदम मारहाण कराताना दिसून येते. घटना पंजाबच्या गुरुदासपूर येथील असून हा सर्व प्रकार पाहून आता यूजर्स सुनेवर कडक कारवाई करण्याची मागणी करत आहेत. सोशल मिडियावर याचा व्हिडिओ चांगलाच ट्रेंड करत असून यातील दृश्यांनी आता सर्वांचाच राग अनावर केला आहे. चला नक्की काय प्रकरण आहे ते सविस्तर जाणून घेऊया.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, हरजीत कौर नावाची एक महिला तिच्या सासू गुरभजन कौर यांना क्रूरपणे मारहाण करताना दिसून येत आहे. हरजीत तिच्या सासूचे केस ओढताना, (twisted) स्टीलच्या काचेने मारताना आणि थप्पड मारताना दिसत आहे. एवढेच नाही तर ती तिच्या सासूला धक्काबुक्की करताना आणि तिच्याविरुद्ध अपशब्द वापरतानाही दिसली. हा व्हिडिओ हरजीतच्या मुलाने चित्रित केला होता, ज्यामध्ये तो त्याच्या आईला “आई, त्यांना जाऊ दे” असे म्हणत असल्याचे ऐकू येते. व्हिडिओतील या सर्वच प्रकाराने आता सोशल मिडियावर संतापाची लाट उसळली आहे.

पंजाब राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष राज गिल यांनी या घटनेची दखल घेतली असून त्यांनी महिलेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (twisted) गिल यांनी गुरुदासपूर पोलिसांना पत्र लिहून या प्रकरणाची त्वरीत चाैकशी करण्याची मागणी केली. पिडित गुरभजन काैर यांनी न्याय आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासही आयोगाने सांगितले आहे. दरम्यान पोलिस या प्रकरणाची पडताळणी करत आहेत.

या घटनेचा व्हिडिओ iनावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करुन यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून एका युजरने लिहिले आहे,(twisted) “मला आशा आहे की अत्याचार करणाऱ्या महिलेविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल आणि कोणीतरी त्या वृद्ध महिलेची आयुष्यभर काळजी घेईल आणि तिला आवश्यक असलेला सर्व आधार आणि प्रेम देईल.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आणि पायात क्रॅम्प आला तर?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हेच काय के कलियुग”.

हेही वाचा :

लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट! मोदी सरकारकडून गव्हाच्या MPS मध्ये १६० रुपयांची वाढ

 मी थोड्या दिवसाचा पाहुणा, आता…; मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधानEdit

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *