प्रवास करताना मृत्यू कधी, कुठे, कसा भेटेल याचा काही नेम नसतो. सोशल मीडियावर अशा अनेक धक्कादायक अपघातांचे (accident) व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे क्षणभरात हृदय सुन्न करणारे असतात. अशाच प्रकारची एक भयंकर घटना उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये घडली असून, हरिद्वारमध्ये अस्थि विसर्जनासाठी निघालेल्या कुटुंबातील सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही दुर्घटना टीटवी-पाणिपत-खातिमा राष्ट्रीय महामार्गावर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब आपल्या जवळच्याच्या अस्थी घेऊन हरिद्वारला निघाले होते. प्रवासादरम्यान, गाडी अत्यंत वेगात चालवली जात होती, आणि चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. चालकाला बहुधा झोप लागल्याने, त्याला समोर उभा असलेला कंटेनर वेळेत दिसला नाही. काही क्षणातच कार जोरात कंटेनरवर जाऊन आदळली. अपघात इतका भयानक होता की, गाडीचा चक्काचूर झाला आणि सहाही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

या भीषण अपघाताचा(accident) संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी दुःख आणि संताप व्यक्त केला आहे.

हे प्रकरण केवळ एका अपघाताचे नसून, वाहन चालवताना सुरक्षिततेचे नियम पाळले नाही, तर काय होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण आहे. वेगात गाडी चालवणं, विश्रांती न घेता सतत प्रवास करणं, झोपेच्या झटक्यांकडे दुर्लक्ष करणं, या सगळ्यांचा शेवट अनेकदा अशाच शोकांतिकेत होतो.

या अपघातामुळे संपूर्ण कुटुंबाचा आघात झाला आहे. अस्थि विसर्जनासाठी निघालेलं एक घर, आता स्वतःच्या माणसांच्या अस्थी उचलण्याच्या दु:खात बुडालं आहे. हा प्रसंग केवळ त्या कुटुंबापुरता मर्यादित नाही, तर प्रत्येकासाठी एक चेतावणी आहे.

या घटनेचा व्हिडिओ @Deadlykalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ड्रॉयव्हरच लक्ष कुठे होतं?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप वाईट घटना आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “म्हणूनच नेहमी सीट बेल्ट बांधून बसायला हवं”.

हेही वाचा :

२ लाख घेऊन दलालाने जुळवलं लग्न, पहिल्याच रात्री नवरीने… 

7 वर्षाच्या मुलाला बेदम मारलं, पाय बांधून उलट लटकवलं अन्… पाहूनच उडेल थरकाप; Video Viral

‘मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होणार’; खासदार शाहू महाराज यांचा इशारा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *