राज्यातील राजकारणाला हादरवणारी घटना सोलापूर जिल्ह्यातील(Deputy) करमाळा तालुक्यात उघडकीस आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांचे ज्येष्ठ बंधू आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर आज सकाळी करमाळा तालुक्यातील हिवरवाडी येथे शेतात असताना प्राणघातक हल्ला झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.हल्ल्यानंतर महेश चिवटे यांना तातडीने करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उपचार सुरू असताना त्यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, ” (Deputy)हा हल्ला दिग्विजय बागल आणि रश्मी बागल कोलते यांनी सुपारी देऊन घडवून आणला “. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात धक्काच बसला आहे.विशेष म्हणजे, दिग्विजय बागल हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवार होते. तर त्यांची बहिण रश्मी बागल कोलते या भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख आहेत. त्यामुळे या हल्ल्याच्या आरोपानंतर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना–भाजप वाद पुन्हा उफाळून आला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला असून निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास वेगाने सुरू आहे.(Deputy) आता या घटनेनंतर भाजपचे वरिष्ठ आणि एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.दरम्यान, या घटनेमुळे शिंदे गट, भाजप आणि स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात नवे वाद निर्माण झाले आहे.
हेही वाचा :
‘जास्त उडू नकोस..’ फराहने पापाराझींसमोरच कुक दिलीपला सुनावलं, वागणूक पाहून चाहते…
सांगलीत भरवस्तीत थरार; बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न, नागरिकांनी पाठलाग करत पकडले
फोन, टीव्ही, फ्रिज EMI वर घेताय? RBI च्या निर्णयामुळे बसणार फटका; वाचा सविस्तर