चित्रपट निर्माती आणि कोरिओग्राफर फराह खान आणि तिचा कूक, दिीप यांचे व्हिडीो(Cook), त्यांची नोकझोक ही सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. त्यांचे व्हीलॉग अलिकडे चर्चेचा विषय बनले आहेत. मात्र याच फराहने कॅमेऱ्यांसमोपर, पापाराझींसमोरच कूक दिलीप याला जी वागणूक दिली, त्याची सध्या बरीच चर्चा होत आहे. फराहचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये तिची वागणूक पाहून खरी फराह कोण, असा प्रश्न काही चाहत्यांना पडला आहे. कारण त्या व्हिडीओमध्ये ती कूक दिलीप याला ढकलताना, त्याच्या रूडली बोसताना दिसली.

व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये फराह खान ही आशिष चंचलानी आणि मुनावर फारुकी यांच्यासोबत एका पापाराझी स्पॉटिंग दरम्यान पोज देत होती, तेव्हा दिलीपने त्यांच्यासोबत उभं राहण्याचा प्रयत्न केला.(Cook)मात्र ते पाहून फराह त्याला म्हणाली, मध्ये येऊ नको, मध्ये येऊ नको, जास्त उडू नकोस.” अशा शब्दांत तिने फटकारलं. मात्र ते पाहून सोशल मीडियावरच्या काही यूजर्सना फराहचे ते वागणं आवडलं नाही आणि कमेंट सेक्शनमध्ये विविध प्रतिक्रिया देत तिला फटकारलं आहे. मात्र त्यावर फराहने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
जेव्हा हा व्हिडिओ समोर आला तेव्हा फराहला ट्रोल करण्यात आले. रीलच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, “रील विरुद्ध रिअॅलिटी.” रीलमध्ये, मुनावर फारुकी आणि आशिष चचलानी फराहसोबत आहेत आणि फराह दिलीपला सांगते, “मध्ये येऊ नकोस… खूप उंच उडू नकोस.” नंतर जेव्हा फराहने रील पाहिली तेव्हा तिने स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला की मी मुलाशी देखील असं बोलतं. कमेंट सेक्शनमध्ये तिने लिहिले, “जाणं गजेचं हे. मी माझ्या मुलालाही तेच सांगेन. पाहुणा नेहमीच सर्वात महत्वाचा असतो.” असं तिने म्हटलं.
फराह खानने अलीकडेच तिच्या यूट्यूब चॅनलवर ‘आंटी किसको बोला?’ हा एक नवीन शो लाँच केला आहे. अलिकडच्याच एका एपिसोडच्या शूटिंगनंतर, ती विनोदी कलाकार मुनावर फारुकी आणि आशिष चंचलानी यांच्यासोबत दिसली, जे तिच्यासोबत जज म्हणून सामील झाले. ते तिघेही पोज देत असताना,(Cook) दिलीप हा फ्रेममध्ये आला आणि ते पाहून पापाराझी मजेत ओरडले की, ” आता खरा स्टार आला आहे.” त्यानंतर दिलीपने त्यांच्यासोबत पोज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तेव्हाच फराहची कमेंट आली आणि तिने त्याला फटकारलं. त्यावर विविध कमेंट्स येत आहेत.

खरंतर फराह खान हिने 2024 साली तिचा कूक दिलीपसोबत स्वयंपाकाचे व्लॉग बनवण्यास सुरुवात केली. व्हिडिओंमध्ये, ती वेगवेगळ्या सेलिब्रिटींच्या घरी जाते, त्यांच्या स्वयंपाकघरात त्यांच्यासोबत पदार्थ बनवते(Cook)आणि मनोरंजक गप्पा मारते. त्यांचे व्लॉग्स खूप लोकप्रिय झाले आहेत आणि फराह आणि दिलीपच्या मजेदार संभाषणांमुळे त्यांना सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्याच्या मुलांना चांगल्या शाळांमध्ये शिक्षण दिल्याबद्दल आणि त्याच्या गावात एक मोठे घर बांधण्यास मदत केल्याबद्दल दिलीप अनेकदा फराहचे आभार मानतो.
हेही वाचा :
लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट! मोदी सरकारकडून गव्हाच्या MPS मध्ये १६० रुपयांची वाढ
मी थोड्या दिवसाचा पाहुणा, आता…; मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधानEdit