सध्या महागाई खूप जास्त वाढत आहे. त्यामुळे जीवनावश्यक गोष्टी घेतानादेखील (EMI)सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. दरम्यान, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमतीदेखील खूप वाढत आहेत. या परिस्थितीत अनेकजण इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ईएमआयवर खरेदी करतात. दरम्यान, आता आरबीआय लवकरच नवीन नियम लागू करणार आहे.आता ईएमआयवर मोबाईल, टीव्ही आणि वॉशिंग मशीन खरेदी करणाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. जर तुम्ही ईएमआय भरला नाही तर तुमचा मोबाईल, टीव्ही बंद होणार आहे. अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र, बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये चर्चा सुरु आहे.

अमेरिकेसहीत अनेक देशांमध्ये हा नियम आहे. जर तुम्ही एखाद्या वस्तूचा ईएमआय भरला नाही तर तुमची वस्तू बंद होते. जर तुम्ही कारचा ईएमआय भरला नाही तर कार सुरू होत नाही.(EMI) तसाच नियम भारतात लागू होण्याची शक्यता आहे.आरबीआय हा नियम मोबाईल, स्मार्ट टीवी, वॉशिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर लागू करण्याची शक्यता आहे. यामध्ये ईएमआयवर कोणतीही वस्तू खरेदी केली तर तुमच्या फोनमध्ये एक अॅप इन्स्टॉल केले जाईल. जेव्हा तुम्ही ईएमआय भरणार नाही तेव्हा तुमची वस्तू बंद होणार आहे.

या नियमामुळे तुमच्या वैयक्तिक माहितीला कोणत्याही प्रकारची हानी पोहचणार नाही. (EMI)तुमची सर्व माहिती सुरक्षित असणार आहे.जर हा नियम लागू झाला तर डिफॉल्ड आणि फ्रॉडच्या घटना कमी होईल. याचसोबत बँकांनादेखील फायदा होणार आहे. जर तुमची वस्तू बंद पडली तर युजर्संना अडचणी होती. परिणामी ते ईएमआय भरतील.
हेही वाचा :
लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट! मोदी सरकारकडून गव्हाच्या MPS मध्ये १६० रुपयांची वाढ
मी थोड्या दिवसाचा पाहुणा, आता…; मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधानEdit