देशाची राजधानी दिल्लीत दोन नवीन धक्कादायक प्रकरण समोर आली आहेत.(neighbor) दोन्ही प्रकरणात दोन्ही महिलांच्या मुलांचं अपहरण करण्यात आलेलं. अपहरणकर्त्यांवर महिलांसमोर शरीरसंबंधाची अट ठेवल्याचा आरोप आहे. त्यांच्या बालकांच अपहरण करुन महिलांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या दोन्ही प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केलाय.पहिलं प्रकरण दिल्लीच्या कृष्ण नगर पोलीस ठाणे क्षेत्रातील आहे. एका महिनेने पोलिसात तक्रार नोंदवली. महिलेने शेजाऱ्याविरोधात तक्रार नोंदवली. शेजाऱ्यावर तीन वर्षाच्या मुलाच अपहरण केल्याचा आरोप केला. मुलाच अपहरण करुन आपल्यावर आरोपी शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता, असं महिलेने तक्रारीत म्हटलय.

पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणात माहिती देताना सांगितलं की आरोपी, महिलेला दोन-तीन महिन्यापासून ओळखत होता. आरोपी लग्नासाठी दबाव टाकत असल्याचा महिलेने आरोप केला. पण महिलेने लग्नासाठी त्याला नकार दिला. त्यानंतर रागाच्या भरात आरोपीने महिलेच्या तीन वर्षाच्या मुलाचं अपहरण केलं. (neighbor)आरोपी उपचाराच्या बहाण्याने मुलाला घेऊन गेला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी लगेच कारवाई केली.तपासात पोलिसांना समजलं की, आरोपी सूरत रेल्वे स्टेशनवर आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली.

रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्यानंतर पोलीस आरोपीला दिल्लीला घेऊन आले. दुसरं प्रकरण दिल्ली विकासपुरीच आहे. एका महिलेने आपल्या सात वर्षाच्या मुलाच्या अपहरणाची तक्रार नोंदवली.महिलेने तक्रारीत म्हटलं की, एका व्यक्तीने तिच्या मुलाचं अपहरण केलं आहे.(neighbor)ज्या व्यक्तीने मूल पळवलं, त्याच्यासोबत मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते असं महिलेने सांगितलं. आरोपी संशय घ्यायचा, मारहाण करायचा म्हणून तिने त्याला सोडून दिलं. मुलगा शाळेत गेल्यानंतर परत आला नाही. तपासानंतर आरोपीला अटक केलीय.

हेही वाचा :

 ‘जास्त उडू नकोस..’ फराहने पापाराझींसमोरच कुक दिलीपला सुनावलं, वागणूक पाहून चाहते…

सांगलीत भरवस्तीत थरार; बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न, नागरिकांनी पाठलाग करत पकडले

फोन, टीव्ही, फ्रिज EMI वर घेताय? RBI च्या निर्णयामुळे बसणार फटका; वाचा सविस्तर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *