रात्रीच्या सुमारास भरवस्तीत चोरट्यानी हैदोस घातला होता.(Attempt) घरात घुसून रिव्हॉल्वरचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या चोरट्यांचा हा प्रयत्न फसला असून या थरारक घटनेत नागरिकांनी पाठलाग करत पळून जाणाऱ्या चोरट्यांना पकडून बेदम चोप दिला. यानंतर पोलिसांना माहिती देत चोरट्यांना पोलिसांच्या सांगली शहरात रात्रीच्या सुमारास हि थरारक घटना घडली आहे. चोरट्यानी एका बंगल्यामध्ये धाडसी दरोड्याचा प्रयत्न केला आहे. शहरातल्या कॉलेज कॉर्नर जवळ असणाऱ्या रतनशीनगर नजीक हा प्रकार घडला आहे. दसऱ्याच्या दिवशी रात्रीच्या सुमारास दोघा चोरट्यांनी दिवेश शहा यांच्या बंगल्यामध्ये प्रवेश करत शहा यांना रिव्हॉल्वरची धाक दाखवत दागिने व पैश्याची मागणी केली. यामुळे शहा हे घाबरून गेले होते.

दरम्यान चोरट्यानी शहा यांच्या डोक्यावर रिव्हॉल्वर ठेवली होती. हा प्रकार सुरू असताना शहा यांच्या पत्नीकडून घराच्या मागील दरवाज्यातून आरडा-ओरडा करण्यात आला.(Attempt) हे पाहून चोरट्यांनी बंगल्यातून पळ काढला. मात्र आरडाओरडा झाल्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. यानंतर नागरिकांनी बंगल्याच्या दिशेने धाव घेतली. यावेळी घरातून चोरटे पडून जाताना दिसून आले.

दरम्यान आवाजाने जमा झालेल्या नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. यावेळी चोरट्यांकडुन नागरिकांवर रिव्हॉलवर रोखण्यात आली. पण नागरिकांनी दगडफेक करत पाठलाग सुरूच ठेवला. (Attempt)यानंतर लपलेल्या चोरट्यांना नागरिकांनी पकडून नागरिकांनी बेदम चोप देत त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. शहर पोलिसांनी दोघां चोरट्यांवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली होती.
हेही वाचा :
लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट! मोदी सरकारकडून गव्हाच्या MPS मध्ये १६० रुपयांची वाढ
मी थोड्या दिवसाचा पाहुणा, आता…; मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधानEdit