आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे.(elections)दिवाळीत जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका यांच्या निवडणुका होतील असे संकेत आहेत. या पहिल्या टप्प्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडतील असे म्हटले जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरु असताना ठाकरे गटाला सिंधुदुर्गमध्ये धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटाचे सिंधुदुर्गमधील वैभववाडीचे तालुका अध्यक्ष मंगेश लोके यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला आहे.(elections)भारतीय जनता पक्षामध्ये मंगेश लोके यांचा पक्षप्रवेश झाला आहे. हा उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
सिंधुदुर्गमधील ओरोस येथील भारतीय जनता पक्षाच्या मुख्य कार्यालयामध्ये मंगेश लोके यांचा पक्षप्रवेश झाल्याची माहिती समोर आली आहे. (elections)पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये मंगेश लोके यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंगेश लोके यांचा भारतीय जनता पक्षातील पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे वैभवाडी तालुक्यात आणि सिंधुदुर्गमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. (elections)याचा परिणाम निवडणुकांमध्ये होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे कोकणात ठाकरे गटाचे टेन्शन वाढले आहे.
हेही वाचा :
‘जास्त उडू नकोस..’ फराहने पापाराझींसमोरच कुक दिलीपला सुनावलं, वागणूक पाहून चाहते…
सांगलीत भरवस्तीत थरार; बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न, नागरिकांनी पाठलाग करत पकडले
फोन, टीव्ही, फ्रिज EMI वर घेताय? RBI च्या निर्णयामुळे बसणार फटका; वाचा सविस्तर