पूरस्थितीमुळे राज्यातील जवळपास ७५ लाख शेतकऱ्यांना फटका बसलाय.(announcement)अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीची आज घोषणा होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे महायुती सरकारने सावध पावले उचलली आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज ऑक्टोबर 2025 दुपारी 2 वाजता राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांसोबत संवाद साधणार आहेत.

पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे याचे पंचनामे सध्या सुरू आहेत. या पंचनामे संदर्भात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेतला जाणार आहेत. (announcement)त्यासोबतच केंद्र सरकारकडे झालेल्या नुकसानचे आढावा पाठवण्यासाठी देखील चर्चा होणार आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. त्यावेळी शेतकऱ्यांसंदर्भात मुख्यमंत्री पुन्हा चर्चा करण्याची शक्यता आहे.

राज्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी (announcement)आज मदतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे प्रति हेक्टरी किमान दोन ते पाच हजार रुपये अधिक मदत जाहीर करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडून प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या आर्थिक पॅकेजवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.२६ जिल्ह्यांमधील १७८ तालुक्यांमध्ये १२ ते २८ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ७५ लाख शेतकऱ्यांचे सुमारे ६० लाख हेक्टरहून अधिक जमिनींवरील पिकांचे नुकसान झालेले आहे. एक लाख ६१ हजाराहून अधिक पशुधन मृत्यूमुखी पडले आहेत. ९ हजार २६३ हेक्टर जमीन खरडून गेल्याने २६ हजार शेतकर्यांना फटका बसला आहे.
हेही वाचा :
फक्त कल्पना हवी!
शेतकऱ्यांना 2,265 कोटींचा फायदा
कंपनीचा शेअर एकाच दिवसात 38 टक्के वाढला