पुण्यामध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कारचा अपघात झाला होता,(accident)तिच्या कारने रिक्षाला धडक दिली, या अपघातामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता, सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या अपघातासंदर्भात आता भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते डीसीपींना गौतमी पाटीलवर कारवाई करण्यासंदर्भात फोनवरून सूचना देताना दिसत आहेत, दरम्यान यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. सोबतच जेव्हा अपघात झाला तेव्हा त्या गाडीमध्ये गौतमी पाटील नव्हती असा मोठा दावा देखील त्यांनी केला आहे.

‘तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भरदिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही.(accident) गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही, पण तिच्या गाडीमुळं रिक्षाचा अपघात झाला असेल तर निश्चितच त्याची चौकशी झाली पाहिजे, दोषी असेल त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्या रिक्षावाल्या कुटुंबाला भरीव मदत मिळाली पाहिजे आणि जखमीचा वैद्यकीय खर्चही वसूल केला पाहिजे. पण अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही…!

आपल्याविषयी माझ्या मनात आदर आहे, आपण संवेदनशील आहात. पण कार्यकर्त्यांचं किती ऐकायचं हेही आपण ठरवलं पाहिजे. महिला, गरीब, सामान्य माणूस यांना त्रास देणाऱ्या गुंडांना जेरबंद करण्यासाठी मंत्र्यांनी असे फोन केले तर राज्यात खऱ्या अर्थाने रामराज्य येईल.. पण गुंडांना पाठीशी घालून आणि निरपराधांना गुन्ह्यात गोवून मंत्री म्हणून आपण कोणता आदर्श घालून देत आहात?’ अशी पोस्ट रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे.

दरम्यान दुसरीकडे आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी देखील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात जाऊन या अपघाताची माहिती घेतली आहे.(accident)पोलीस गौतमी पाटीलला वाचवत असल्याचा आरोप या अपघातात जखमी झालेल्या रिक्षाचालकाच्या नातेवाईकांकडून यावेळी करण्यात आला आहे. लोकांनी पुरावे आणून देण्यापेक्षा तुम्ही वेगाने तपास करा, गरीब माणूस आहे, तपास व्यवस्थित करा अशा सूचना यावेळी धंगेकर यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

हेही वाचा :

फक्त कल्पना हवी! 

शेतकऱ्यांना 2,265 कोटींचा फायदा

कंपनीचा शेअर एकाच दिवसात 38 टक्के वाढला

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *