खोकल्याचा त्रास जाणविल्यानंतर देण्यात आलेल्या कफ सिरपमुळे(Health)नागपुरात दाखल १३ मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथून आलेल्या ३६ पैकी १३ बालकांचा मृत्यू झाला आहे. यात प्राथमिक तपासणीत १३ रुग्णाचा सबंध आणि हिस्ट्री मध्ये कफ सायरफ असल्याचे समोर आले असून मुलांच्या मृत्यूनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

नागपूर महानगर पालिका आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.(Health) सुरवातीला उपचारासाठी आलेल्या केसेसवर ऍक्युट इन्सफलाईटीस सिंड्रोम म्हणजेच ‘मेंदूज्वर’ म्हणून उपचार करण्यात आले आहेत. मात्र नंतर हा मेंदूज्वर नसून विषबाधेचा प्रकार असल्याचे तपासणीत समोर आले. खासकरून मध्य प्रदेशातून नागपुरात उपचारासाठी आलेल्या रुग्णांची किडनी निकामी होऊन मेंदूवर सूज येणे आणि नंतर रुग्ण कोमामध्ये जात मृत्यू होणे असे लक्षण दिसून आले.

कफ सिरपमुळे आतापर्यंत नागपुरात विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले एकूण १३ मुलांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृत लहान मुले हि मध्य प्रदेशातील छिंदवाडा आणि सिवनी जिल्ह्यातील आहेत. (Health)नागपुरात उपचारासाठी आतापर्यंत एकूण ३६ रुग्ण दाखल झाले होते. यापैकी छिंदवाडा जिल्ह्यातील १२ आणि सिवनी जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृतांमध्ये समावेश आहे. नागपुरातील शासकीय मेडिकल रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयात या मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कफ सिरपमुळे लहान मुलांच्या मृत्यूनंतर प्रशासन खडबडून जागे जागे झाले आहे. यानंतर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयच्या पथकाने शासकीय मेडिकल रुग्णालयात पोहचून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच DMER च्या चमूमध्ये बीजे महाविद्यालयातील बालरोग विभाग प्रमुख (Health)डॉ. आरती किनीकर, जेजे महाविद्यालयातील बालरोग विभाग प्रमुख डॉ. छाया वळवी, जे जे महाविद्यालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख भालचंद्र चिकलकर यांचा समावेश आहे. यावेळी उपचार सुरू असलेल्या रुग्णांची स्थिती, त्यांच्यावर सुरू असलेले उपचार आणि मेडिकल हिस्ट्री तपासण्यात आली.

संशयित मेंदूज्वरच्या काही केसेस दरवर्षी आढळत असतात. नंतर लघवी थांबणे असे प्रकार समोर आले आहेत. मात्र छिंदवाडा येथून महिती मागावली आहे. त्यांनी दिलेल्या सूचनेवरून चौकशी सुरू केली. NIV च्या टीमने तपासणी केली असता चांदीपुरा, स्क्रब टायफस, यासहस अन्य टेस्ट निगेटिव्ह आल्या होत्या. (Health) मात्र छिंदवाडा येथून आलेले रुग्णामध्ये कोल्डद्रीफ औषध मिळून आले. यात सॅम्पल सील करण्यात आले आहे.

हेही वाचा :

फक्त कल्पना हवी! 

शेतकऱ्यांना 2,265 कोटींचा फायदा

कंपनीचा शेअर एकाच दिवसात 38 टक्के वाढला

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *