अतिवृष्टीने राज्यात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेताला तळ्याचं स्वरुप आलं.(valuable)खरीप पिकांचंच नाही तर भाजीपाल्याच मोठं नुकसान झाले. शेतात पाणी साचल्याने भाजीपाला सडला आहे. तर ज्या ठिकाणी उत्पादन झालं. त्या मालाची आवक होऊ शकली नाही. मागणी जास्ता आणि पुरवठा कमी झाल्याने भाजीपाल्याच्या किंमती महागल्या. नाशिकमध्ये एका जुडीचा भाव ऐकून ग्राहकांना मोठा धक्का बसला. तर इतर भाजीपाल्याच्या किंमती पण गगनाला भिडल्या आहेत.

कोथिंबिरीने हंगामातील सर्वात मोठा उच्चांक गाठला. एका जुडीला 200 रुपये दर मिळाला.(valuable)नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर जुडीला 200 रुपयांचा विक्रमी दर मिळाला. काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील कोथिंबीरीचे उभे पीक मोठ्या प्रमाणात नष्ट झाले. कोथिंबिरीची आवक घटल्याने बाजारात किंमती वधारल्या. दरात 30 टक्क्यांची वाढ झाली.गेल्या गुरुवारी चायना कोथिंबीरला 170 रुपये प्रति जुडी, 17,050 रुपये शेकडा भाव मिळाला होता. यंदा पहिल्यांदाच कोथिंबीरीला 20 हजार रुपये शेकडा असा हंगामातील सर्वोच्च भाव मिळाला. कोजागरी पौर्णिमेमुळे सोमवारी आवक आणखी घटली, त्यामुळे मागणी वाढली आणि दर गगनाला भिडले. नाशिक बाजार समितीत आज 53 हजार कोथिंबीर जुड्यांची आवक नोंदविण्यात आली.
धुळे तालुक्यातील कापडणे वरखेडी आधी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी भाजीपाल्याचे उत्पन्न घेत असतात. सध्या मोठ्या प्रमाणात शेपू, पालक, मेथी, कोबीची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. (valuable)यात शेपूला 50 रुपये किलोने भाव भेटला. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. गेल्या अनेक दिवसानंतर शेपूला चांगला भाव भेटत असल्याने शेतकरी आनंदात आहे. सध्या शेपू काढणीला वेग आला आहे.राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने मराठवाडा विदर्भ आणि धाराशिव या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीच मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे आता भाजीपाला मध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे. दादरच्या भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. परिणामी सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट बिघडले आहे. पहिले ग्राहक १ किलो भाजी खरेदी करायचा आता अर्धा किलोच भाजी खरेदी करत आहेत. पावसामुळे भाज्यांना पाणी लागून त्या खराब होत असल्याने यामध्ये वाढ झाली आहे असं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे

कोणत्या भाजीपाल्यामध्ये वाढ
वांगी 80 रुपये किलो
टमाटे 40 रुपये किलो
फ्लॉवर 80 रुपये किलो
काकडी 60 रुपये (valuable)किलो
कोबी रुपये 60 किलो
शिमला मिरची 120 रुपये किलो
हेही वाचा :
फक्त कल्पना हवी!
शेतकऱ्यांना 2,265 कोटींचा फायदा
कंपनीचा शेअर एकाच दिवसात 38 टक्के वाढला