देशभरातील १५ चिमुकल्यांच्या(children) मृत्यूमुळे प्रशासन खळबळून उभं राहिलं आहे. यात नागपूरच्या रुग्णालयातील १८ महिन्यांच्या मुलीचा समावेश आहे. विषारी कफ सिरपमुळे बालकांच्या आरोग्यावर धोका निर्माण झाल्यामुळे आता सिरप प्रवर्गातील औषधं डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.

मध्यप्रदेशातील बालकांच्या(children) मृत्यूच्या घटनेनंतर राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाने सर्व किरकोळ औषधी विक्रेत्यांना सूचना दिल्या आहेत. औषध विक्रेत्यांनी सिरप प्रवर्गातील औषधं डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय देऊ केली तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा विभागाकडून देण्यात आला आहे. सिरपमध्ये घातक डायइथिलीन ग्लायकॉल आढळल्याने मुलांच्या किडनीवर परिणाम होऊन मेंदूवर सूज येत होती. बहुतेक मृत्यू मध्यप्रदेशातील छिंदवाडा परिसरात नोंदवले गेले आहेत.

या प्रकरणानंतर सिरप आणि उत्पादक कंपनीवरील सर्व उत्पादनांवर तातडीची बंदी घालण्यात आली आहे. दोषी डॉक्टर आणि निर्माता कंपनीवर गुन्हे दाखल केले गेले असून, केंद्र आणि राज्य सरकार यांनी कडक कारवाई सुरू केली आहे.आता पालकांनी कफ सिरप वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे, अन्यथा बालकांच्या आरोग्यावर धोका निर्माण होऊ शकतो.
हेही वाचा :
सरन्यायाधीशांचा अवमान…! ऐशा नरा, मोजूनी माराव्या पैजारा!
अभिनेत्री शिल्पा शेट्टीची तब्बल 4 तास चौकशी; अटक होण्याचीही शक्यता
व्हॉट्सअॅपमध्ये मोठा बदल! टेलिग्रामप्रमाणे युजरनेम फीचर येणार