तुम्हालाही बॉलिवूड सेलिब्रिटींसारखे लांबसडक, दाट आणि चमकदार केस (hair)हवे आहेत का? मग ‘धक-धक गर्ल’ माधुरी दीक्षितने सांगितलेला हा घरगुती हेअर पॅक नक्की वापरून बघा. केस सुंदर ठेवण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन महागडे ट्रीटमेंट्स घेण्याची गरज नाही. नैसर्गिक घटकांनी बनवलेला हा हेअर पॅक तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया माधुरीचा हा खास ब्यूटी सिक्रेट.

या हेअर पॅकसाठी तुम्हाला पिकलेले केळे लागेल. सर्वप्रथम केळ्याचे छोटे तुकडे करून ते मॅश करून घ्या. आता एका वाडग्यात हे मॅश केलेले केळे, एक चमचा नारळाचे तेल आणि अर्धा चमचा मध घाला. सर्व घटक एकत्र करून त्याची छान स्मूद, एकसंध पेस्ट तयार करा.

हा हेअर(hair) पॅक संपूर्ण केसांवर समान प्रमाणात लावा. उत्तम परिणामांसाठी तो १५ ते २० मिनिटे केसांवर तसेच ठेवावा. त्यानंतर हलक्या शॅम्पूने केस धुवून टाका.केळे, नारळाचे तेल आणि मध यांमध्ये असणारे पोषक घटक केसांसाठी वरदान ठरतात. या पॅकमुळे केस अधिक मऊ, रेशमी आणि चमकदार बनतात. तसेच डॅन्ड्रफची समस्या कमी करण्यासही मदत होते. केसांची नैसर्गिक चमक परत मिळवण्यासाठी हा केमिकल-फ्री हेअर पॅक एक उत्तम उपाय आहे.
हेही वाचा :
विवाहित महिलेने तरुणाच्या गुप्तांगावर केला चाकूने हल्ला…
बारावी उत्तीर्णांसाठी NIA मध्ये नोकरीची संधी….
बाबा वेंगाची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरणार? जगात मोठे संकट येणार?