शिंकताना आपले हृदय(heart) काही सेकंदांसाठी थांबते असा विश्वास अनेकांना आहे. शिंक येण्यापूर्वी छातीवर दाब जाणवतो, श्वास घेण्यास त्रास होतो आणि शिंक झाल्यावर हलकी चमकही छातीत जाणवते. त्यामुळे अनेकजण शिंकताना देवाचे नाव घेतात, तसेच असा भास होतो की हृदयाने काही सेकंदांसाठी ब्रेक घेतला आहे.

पण या लोकप्रिय विश्वासात काहीही तथ्य नाही. शिंक ही एक सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये नाकातील गुदगुल्यांचा सिग्नल मेंदूपर्यंत पोहोचतो आणि शिंक येते. शिंक येण्यापूर्वी छातीवर येणारा दाब आणि शिंकताना जोराने होणारा श्वास हृदयाच्या ठोक्यांवर थेट परिणाम करत नाहीत. फक्त छातीवरील दाबामुळे रक्तप्रवाहात काही प्रमाणात बदल होतो आणि त्यामुळे छातीत हलकी चमक किंवा अस्वस्थतेची जाणीव होऊ शकते.

विशेषज्ञांचे म्हणणे आहे की, शिंक येताना हृदयाचे ठोके थांबत नाहीत. हृदयाची(heart) क्रिया अखंडपणे सुरूच असते, फक्त शिंकमुळे होणाऱ्या शारीरिक संवेदनांमुळे लोकांना हृदय थांबल्याचा भास होतो. त्यामुळे शिंक आणि हृदयाची कामगिरी यामध्ये थेट संबंध नाही.शिंक हा फक्त शरीराचा नैसर्गिक प्रतिक्रिया आहे, हृदयावर धोका निर्माण करत नाही आणि ही केवळ एक मिथक आहे की शिंकताना हृदय थांबते.
हेही वाचा :
अमित शाहांनीही बदलला ईमेल; झोहो मेलमध्ये असं काय आहे खास..
सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
भारत-पाक सामने थांबवा.., त्यांचा वापर..’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा घणाघात